अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

जगभरात कोरोनाचे सावट थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच रस्त्यावर नागरीकांची प्रचंड गर्दी दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी फुटपाथ रिकामे करण्याचे नवे आदेश दिले होते. त्यांनी १९ मार्चला सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना फुटपाथवरील कच्च्या आणि पक्क्या स्वरुपातील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रभाग अधिकाऱ्यांकडून या आदेशाला दुर्लक्ष करण्यात आले.

फुटपाथवरील हा अतिक्रमणाचा प्रकार सर्वांत जास्त गर्दी असणाऱ्या तिसगांव नाक्यावरील प्रभाग ५ ड अंतर्गत दिसून आला. तिसगांव नाक्यावरील हॉटेल जरीमरी बारसमोरील फुटपाथवर एक टेम्पो कायमस्वरुपी थांबलेला आहे. याशिवाय, फुटपाथवर मच्छी विक्रेते आणि अनेक व्यवसायिक आपले दुकान मांडून बसले आहेत. त्यांनी फुटपाथवर टेबल आणि त्यांचे अन्य साहित्य घेऊन फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. संपुर्ण फुटपाथ व्यवसायिकांनीच फुटपाथ व्यापून टाकले आहे. याशिवाय या फुटपाथवरील दोन चिकन व्यवसायिकांकडे अधिकृत लायसेन्ससुद्धा उपलब्ध नाही आहेत. या विक्रेत्यांच्या फुटपाथवरील या अतिक्रमणामुळे नागरिकांची कोंडी होत आहे. त्यातच सुनील पवार यांच्या आदेशाकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.


हेही वाचा – महाविकास आघाडीतील अजून एक नेता अडचणीत, महिलेचा बलात्काराचा आरोप

First Published on: April 1, 2021 9:15 PM
Exit mobile version