उत्सव 75 ठाणे! मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सव 75 ठाणे! मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे – ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व उत्सव 75 ठाणे अंतर्गत आयोजित केलेल्या मराठी परिभाषा कोश प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शब्दकोशामुळे मूळ शब्द व त्याचा अर्थ समजण्यास मदत होते. शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याचा अर्थ त्या शब्दाचा प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. सर्वच विषयांचा त्याचप्रमाणे विविध वाङ्मयांचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोश महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘घरोघरी तिरंगा’उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १२ आणि १३ ऑगस्ट रोजी विद्या प्रसारक मंडळाच्या बेडेकर महाविद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये मराठी इंग्रजी हिंदी आणि संस्कृत भाषेतील ४०० शब्दकोशांचा समावेश आहे. २० खंडांमध्ये असलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, मोलसवर्थचा शब्दकोश, ऑक्सफर्डने ६० खंडामध्ये प्रकाशित केलेला चरित्रात्मक शब्दकोश पाल्ग्रेव्ह चा अर्थशास्त्र शब्दकोश, संज्ञा संकल्पना कोष त्याचप्रमाणे विविध विषयासाठी असलेले शब्दकोश, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व परिभाषा कोष, शासन व्यवहारकोश इत्यादी महत्वपूर्ण शब्दकोश या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.

हेही वाचा – ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरी झाली राखीपौर्णिमा

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे, डॉ महेश पाटील, डॉ. प्रियंवदा टोकेकर, हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समितीचे समन्वयक डॉ. दीपक साबळे, सर्व विभाग प्रमुख, सर्व ग्रंथालय कर्मचारीआणि ग्रंथालय शास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल नारायण बारसे यांनी प्रदर्शनाची भूमिका विशद करून सर्वांचे स्वागत केले. दोन दिवस सुरू असलेल्या या मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शनास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

First Published on: August 13, 2022 1:17 PM
Exit mobile version