दिव्यात रिक्षाचालकांकडून मनमानी कारभार, जवळचे भाडे नाकारत असल्याने प्रवासी त्रस्त

दिव्यात रिक्षाचालकांकडून मनमानी कारभार, जवळचे भाडे नाकारत असल्याने प्रवासी त्रस्त

दिव्यात शेअर रिक्षाचालकांकडून मनमानी कारभार सुरू असून जवळचे भाडे नाकारले जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अनेक ग्राहकांनी रिक्षा संघटनांकडे तक्रारी केल्या आहेत. रिक्षाचालकांच्या या उद्दामपणाविरोधात ग्राहकांनी  संताप व्यक्त केला असून अशा रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Passengers suffering due to refusal of nearby fares in diva)

हेही वाचा – पक्षविरोधी कारवाई भोवली, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

याप्रकरणी रिक्षाचालक संघटेनेचे खजिनदार प्रवीण बारशीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, दिव्यात शेअर रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी आल्यास आम्ही संबंधित रिक्षाचालकावर आरटीओ किंवा पोलिसांतर्गत कारवाई करतो. मात्र, प्रत्येकवेळी अशी कारवाई करणे शक्य नसते. त्यामुळे ग्राहकांनी रिक्षाचालकांच्या उद्दामपणाला भाव न देता इच्छितस्थळी पोहोचवण्याची विनंती करावी. याविरोधात लवकरच आम्ही संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांसाठी नियम तयार करणार आहोत. तसेच, रिक्षाचालक हे प्रवासांना सेवा देण्याकरता असतात. त्यामुळे त्यांनी कोणतेच प्रवासी भाडे नाकारू नये, असं आवाहनही केले आहे.

हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

दिवा येथे शेअर रिक्षाचे कमीत कमी भाडे दहा रुपये असून जास्तीत जास्त भाडे २० रुपये आहे. दिवा स्थानक ते धर्मवीर नगर १० रुपये आकारण्यात येतात. तर दिवा स्थानक ते बेडेकर नगर १५ रुपये आकारण्यात येतात. मात्र, रिक्षा चालकांकडून दिवा स्थानक ते बेडेकर नगरचेच प्रवासी घेतले जातात. परिणामी धर्मवीर नगरपर्यंतच्या प्रवाशांना पायपीट करावी लागते.

हेही वाचा – ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच शक्तिप्रदर्शन, उल्हासनगरात कार्यालयावर दगडफेक

धर्मवीर नगर येथे राहणाऱ्या रहिवासी प्राची साळवी म्हणाल्या की, रात्री उशिराने घरी येणाऱ्या रहिवाशांनाही जवळची भाडी नाकारली जातात. कमी भाडे असलेल्या अंतरावर उतरणाऱ्या महिलानांही रिक्षात बसवले जात नाही. त्यामुळे अनेक महिलांना रात्रीचा प्रवास रस्त्याने पायी करावा लागतो. अनेक रिक्षाचालक मनमानी पद्धतीने प्रवासी भरत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभाला आळा घालावा.

First Published on: June 28, 2022 3:18 PM
Exit mobile version