बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करा – आमदार राजू पाटील

बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करा – आमदार राजू पाटील

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर पुन्हा वाढत आहे. कल्याण -डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही सुचना नागरिकांना केल्या आहेत. घरात डास झाले तर कोणी घराला आग लावतो का ? सरसकट लाकडाऊन हा कोरोना प्रसार रोखण्यावर आतातरी उपाय होऊ शकत नाही. कोरोना होतो व योग्यवेळी उपचार घेतल्यास तो लगेच पूर्ण बरा होतो हा विश्वास पण लोकांमध्ये निर्माण व्हायला हवा. कधी कधी एखादी लहानशी सुचना देखील प्रभावी काम करून जाते, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, विजय सुर्यवंशी यांनी नागरिकांना नव्या उपाययोजना सांगितल्या आहेत.

या आहेत उपाययोजना

तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली कोविड केंद्रे टप्प्याटप्प्याने पुन्हा कार्यान्वित करण्यास सुरुवात करायला हवी, यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे , या सर्व उपाययोजना कालबध्द रितीने सुलभ व गतीमानतेने पार पाडण्यासाठी आपल्या देखरेखीखाली सर्व विभागांसाठी विभाग प्रमुख दर्जाचे ‘समन्वय धेकारी ‘ नियुक्त करावेत, या समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कोविड केअर सेंटर , कोविड केअर हेल्थ सेंटर व कोविड केअर हॉस्पिटल या संदर्भातील अडीअडचणी उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधितांशी समन्वय राखायला हवा , त्याचप्रमाणे कोविड 19 बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीशोध (contact tracing ) संदर्भात करावयाच्या कामकाजाबाबतही समन्वय ठेवायला हवा , गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची जबाबदारी घ्यावी, तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प मारण्यात येणार आहेत.आपआपल्या विभागातील कंन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीबाबत संबंधित महापालिका अधिकारी व पोलीस यांच्याशी समन्वयाची भूमिका बजावयाला हवी , शहरातील मोठ मोठे निवासी संकुल आहेत तिथले क्लबहाउस ताब्यात घेऊन तिथेच तात्पुरत्या सोयी उपलब्ध करुन देण्याची उपायोजना केली आहे.

बेडची उपलब्धता दाखवणारे डॅशबोर्ड आपल्या सोशल मीडिया किंवा संकेतस्थळावर दिसेल, जेणेकरून बेडसाठी व लसीकरणासाठी लोकांचा गोंधळ उडणार नाही. सर्व तात्पुरते उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे फायर सेफ्टी ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. सध्या प्रचंड प्रमाणात पसरणाऱ्या कोरोना विरूद्ध सर्वांनी एकत्रित विचारविनिमय करून उपाययोजना करणे गरजेचे आहे .


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा; दोन दिवसात निर्णय घेणार – मुख्यमंत्री

First Published on: April 2, 2021 9:47 PM
Exit mobile version