डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटी बसेसली ब्रेक

डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटी बसेसली ब्रेक

डिझेलचा पुरवठा वेळेत न झाल्याने महाराष्ट्र परिवहन सेवेच्या ठाणे विभागातील एसटी बसला मंगळवारी जवळपास ब्रेक लागल्याचे पाहण्यास मिळत होते. ठाणे विभागाअंतर्गत असलेल्या डेपोची परिस्थिती वेगवेगळी होती. त्यातच शहरातील मुख्य डेपो असलेल्या डेपो १ येथील एस टी बसेस या जिल्ह्यांतर्गत धाव होत्या. हे ऑपरेशन दुपारपर्यंत अवघे २० ते २५ टक्के सुरळीत सुरू होते. बसेस रस्त्यावर धाव नसल्याने कामगारांना सक्तीने रजा जाण्यास सांगितल्याची चर्चा सुरू होती. हा घोळ बँकांना सलग आलेल्या चार सुट्ट्यांमुळे घडला. त्यामुळेच डिझेल मागणीनंतरही वेळेत आला नसावा अशी शक्यता विश्वनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

अपेक्षेप्रमाणे केलेल्या डिझेल ची मागणी सोमवारी रात्री पर्यंत पूर्ण झाली नव्हती, त्यातच, डिझेल मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेला एक- दोन दिवसात पैसे जमा केले जातात. मात्र मध्यंतरी बँकांचा चार दिवस सुरू असलेल्या संपामुळे पैसे जमा झाले नसावे. त्यामुळेच मागणी करून ही डिझेल आला नसावा, त्यातच डिझेलचा तुटवडा असला तरी पूर्ण एसटी बस सेवा बंद झाली असे नाही. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रवासी संख्या कमी झालेली आहे. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला सक्तीने रजा घेण्यास सांगितले नाही.
– विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे परिहवन सेवा

सोमवारपासून ठाणे विभागांतर्गत असलेल्या डेपोत डिझेल नसल्याने मंगळवारी सकाळी सर्व बस आगारात उभ्या असल्याचे चित्र पाहण्यास मिळून आहे. त्यातच सर्व कर्मचारी कामगिरीसाठी डेपोत आले असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांना सक्तीने रजा घेऊन घरी जा असं बळजबरी केली जात असल्याची चर्चा रंगू लागली होती. एसटीची एकही बस निघत नसल्याने प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर येत होता. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना प्रशासनाने गाडी देऊ शकले नाही तर कर्मचाऱ्यांना हजेरी देणे आवश्यक असताना मात्र त्या कर्मचाऱ्यांना रजा घेण्यास सांगण्यात येत होते अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी दिली. तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना रजा घेण्यास सांगितले नाही. डिझेल ची केलेल्या मागणीनुसार डिझेल सोमवारी रात्रीपर्यंत आलेच नव्हते. ही परिस्थिती कल्याण, विठ्ठल वाडी,मुरबाड, शहापूर अन्य डेपो मध्ये सारखी नव्हती. पण, ठाण्यातील मुख्य डेपो असलेल्या १ नंबरच्या डेपोतून फक्त जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू होती. त्यातच हे ऑपरेशन अवघे २० ते २५ टक्क्यांच्या आसपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा –

Lockdown: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन! काय चालू, काय बंद असणार? वाचा

First Published on: March 24, 2021 2:54 PM
Exit mobile version