घरताज्या घडामोडीLockdown: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन! काय चालू, काय बंद असणार? वाचा

Lockdown: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन! काय चालू, काय बंद असणार? वाचा

Subscribe

राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सोयी-सुविधा राहतील. दूध, भाजीपाला, किराणा दुकान सकाळी ७ ते ९ यावेळेत सुरू असणार आहे. तसेच यादरम्यान संपूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप केली आहे. केंद्र सरकारने जिल्ह्या पातळी निर्बंध लादण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहे. त्यामुळे राज्यव्यापी लॉकडाऊन न करता जिल्ह्यास्तरावर लॉकडाऊन केला जात आहे. याबाबत गृहमंत्रालयाने काल (मंगळवारी) नवीन गाईडलाईन जारी केली. ३० एप्रिलपर्यंत हे गाईडलाईन लागू असेल.

- Advertisement -

काय चालू काय बंद?

  • सार्वजनिक आणि खासगी क्रिडांगणे, उद्याने संपूर्णपणे बंद राहतील.
  • सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक प्रतिबंधीत राहील.
  • उपहारगृह, सर्व अनुज्ञत्या, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील.
  • सर्व सलुन, ब्युटी पार्लर बंद असतील.
  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संख्या, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ष संपूर्ण बंद राहतील.
  • सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहने बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने आणि वैद्यकिय कारणास्तव प्रवासाठी खासगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहिल. यासाठी सोबत ओळळपत्र किंवा वैद्यकिय कागदपत्र असणे गरजेचे आहे.
  • सार्वजनिक आणि खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी बंद राहतील.
  • कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्हातील नगरपालिका, नगरपंचायतचे, पोलीस विभागाचे, राज्य आणि केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात आले आहे.
  • तसेच अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आले आहेत.

हेही वाचा – MHA Guidelines: कोरोनाचा कहर! गृहमंत्रालयाने जारी केल्या नवीन गाईडलाईन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -