Thane : कळवा रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू; डीन राकेश बारोट यांनी दिलं स्पष्टीकरण

Thane : कळवा रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू; डीन राकेश बारोट यांनी दिलं स्पष्टीकरण

Thane : ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू (18 patients died in one night) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात तीन दिवसांपूर्वीच उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनही चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट (Dr. Rakesh Barot) यांनी या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. (Thane 18 patients died in Kalwa Hospital Dean Rakesh Barot explained)

राकेश बारोट म्हणाले की, काल रात्री आमच्याकडे 18 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील 6 रुग्ण असे होते की, जे 24 तासाच्या आत गेलेले आहे. यातील 5 रुग्ण असे होते, ज्यांना ताप आणि दम लागणं हे कारण होतं. या सर्व रुग्णांचे पेटलेट्स 6000 होते. असे अत्यावश्यक रुग्ण येतात. ते आलेल्या आम्ही त्यांच्यावर उपचार करायला सुरूवात करतो. यातील एक रुग्ण अशी होती, जिचं अल्सर फुटलेलं होतं. ती रुग्ण इतकी अत्यावश्यक होती की, अगदी 5 मिनिटं उशिरा झाला असता तर जागीच मृत्यू झाला असता. तिच्यावर आम्ही उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही.

हेही वाचा – ठाणे हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण…, जितेंद्र आव्हाड यांचा संताप

आमच्याकडे 18 अत्यावस्थ रुग्ण आले होते. एक 4 वर्षाचा मुलगा भरपूर केरोसीन पीऊन आला होता, आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. दुसऱ्या एका रुग्णाला साप चावला होता, त्यालाही नाही वाचवू शकलो. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यातील काही रुग्ण चार- पाच दिवसांपासून रुग्णालयात होते. दोन रुग्णांपैकी एकाला हेड इंजरी झाली होती, त्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दुसऱ्या रुग्णाच्या ब्रेनला ट्रामा होता, त्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

500 बेड्समध्ये जवळजवळ 600 रुग्णांची भरती

दोन रुग्णांचे फुफ्फुस खराब झाले होते. त्या रुग्णांचा इन्फेक्शन होऊन मृत्यू झाला. चार रुग्ण असे होते, ज्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. आम्ही 500 बेड्समध्ये जवळजवळ 600 रुग्णांना भरती केलं आहे. आम्ही यथाशक्ती काम करत आहोत. डॉक्टर 36 तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इथे येणारा रुग्ण श्रीमंत नसतो. तो गरीब असतो, आदिवासी असतो. त्यामुळे आम्ही कसही करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा – ठाण्याच्या रुग्णालयातील 17 रुग्णांच्या मृत्यूवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

125 मेडिकल टीचर आणि जवळपास 150 एमडी, एमएस डॉक्टर

सध्या माझ्याकडे स्टापमध्ये 125 मेडिकल टीचर आणि जवळपास 150 एमडी, एमएस करणारे डॉक्टर आहेत. 500 बेड्ससाठी माझ्याकडे पुरेसा डॉक्टरांचा स्टाफ आहे. परंतु आता जे जास्त रुग्ण येत आहेत, त्याच्यासाठी माझ्याकडे जागा नाही आहेत. रुग्णालय फुल आहे बेड्सने. जास्त बेड्स लावण्यासाठी मला जागा पाहिजे आणि यापुढे रुग्ण वाढत असतील तर मला डॉक्टरांचीही गरज लागेल, अशी मागणी राकेश बारोट यांनी केली आहे.

कळवा रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णांचा नावे पुढीलप्रमाणे

1. गीता (अनोळखी)
2. झायदा शेख (60 वर्ष)
3. सुनीता इंदुलकर (70 वर्ष)
4. ताराबाई हरी गगे (56 वर्ष)
5. भानुमती पाढी (83 वर्ष)
6. सनदी सबिरा मोहम्मद हुसेन (66 वर्ष)
7.निनाद रमेश लोकूर (52 वर्ष)
8.भास्कर भिमराव चाबूस्वार (33 वर्ष)
9.अमरिन अब्दुल कलाम अन्सारी (33 वर्ष)
10. अशोक जयस्वाल (53 वर्ष)
11. भगवान दामू पोतदार (65 वर्ष)
12. अब्दुल रहीम खान (58 वर्ष)
13. सुनील तुकाराम पाटील (55 वर्ष )
14. ललिताबाई शंकर चव्हाण (42 वर्ष)
15. चेतक सुनील गोडे (4 वर्ष)
16. अशोक बाळकृष्ण निचाल (81 वर्ष)
17. नूरजहाँ खान (60 वर्ष)
18. कल्पना जयराम हुमाने (65 वर्ष)

First Published on: August 13, 2023 2:29 PM
Exit mobile version