मी धर्म बदलला नाही- तनुश्री दत्ता

मी धर्म बदलला नाही- तनुश्री दत्ता

प्रातिनिधिक फोटो

 

 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना आरोप केल्यानंतर आरोपाचे सत्र सुरु झाले आहे. सोशल मीडियावर तनुश्रीवर आरोपांचा पाऊस पडतो आहे. मागील अनेक महिन्यांपासून अमेरिकेत राहात असलेल्या तनुश्रीला देशाची प्रतिमा खराब करायची असल्यामुळे तिने असे आरोप केले आहेत. याच बरोबर तनुश्रीने धर्म बदलला असून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र मी धर्म बदलेला नसल्याचे स्पष्टीकरण तनुश्रीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत सांगितले आहे.

काय म्हणाली तनुश्री

अशा प्रकारचे आरोप लागतच असतात. मी स्वइच्छेने अमेरिकेला गेली होती. मी ख्रिश्चन धर्म स्विकारला नाही. कारण मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. मी नास्तिक नाही मात्र देवाला मानते. मी स्वतःला एका धर्मापर्यंतच मर्यादित ठेवू शकत नाही. मी योगा- साधना, शिवसाधना, बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्मांना जवळून बघीतले आहे. मला कोणाच्या धार्मिक भावना दूखवायच्या नाहीत. मात्र मानवता हाच धर्म असल्याचे मी मानते.

जेष्ठ कलाकारांकडून दबाव

#metoo चळवळ सुरु केल्यानंतर काही जेष्ठ कलाकार आपल्यावर मोहीम बंद करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे  तनुश्रीने सांगितले आहे. कोणाचेही नाव न घेता तनुश्रीने हा खुलासा केला आहे. तसेच बॉलिवूडमधील कलाकारच होण्याऱ्या अत्याचाराबद्दल बोलून देत नसल्याचे ती म्हणाली.

First Published on: October 24, 2018 11:00 AM
Exit mobile version