घरमनोरंजनतनुश्री दत्ताने केला राखी सावंतवर मानहानीचा दावा

तनुश्री दत्ताने केला राखी सावंतवर मानहानीचा दावा

Subscribe

राखी सावंतने अभिनेत्री तनुश्री दत्तावर केलेल्या आरोपानंतर आता तनुश्रीने तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

तनुश्री दत्ताच्या प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्या केलेल्या आरोपानंतर मीडियाच्या समोर येऊन तनुश्री खोटं ठरवणाऱ्या राखीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राखीने तनुश्रीला ड्रग अॅडीक्ट म्हटले असून आता तनुश्रीने राखी सावंतवर १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. मीटू मोहिमेची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर काहींनी तनुश्री तर काहींनी नानाची बाजू घेतली होती. मात्र बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने नाना यांच्याही आधी मीडियासमोर येत तनुश्रीला खोट ठरवलं. तनुश्री ही ड्रग अॅडीक्ट असून ती हॉर्न ओके प्लीज चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नशेतमध्ये असल्याचा दावा राखीने केला होता. यानंतर तनुश्रीने आता राखी विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

काय म्हणाली होती राखी

शूटींगकरता गेल्यावर समजल की, तनुश्रीने स्वतःला वॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतले होते. काही नशात्मक पदार्थ तिने घेतले आणि कित्येक तास दारच उघडले नाही. अखेर ते गाणं माझ्यावर चित्रीत झालं. आज दहा वर्षांनी तिला जाग आली. ती इतक्या मोठ्या कलाकारावर आरोप करते. मनसेवर, राज ठाकरेंवर आरोप करते. ती खोटं बोलतेय. माझं चॅलेज आहे तिला. याबाबत एकजरी पुरावा तनुश्रीने दिला तर मी देश सोडून जाईन. तिच्या आरोपांना नाना उत्तर देणार नाहीत. म्हणून मी समोर येतेय. तनुश्रीला बिग बॉसमध्ये जायचे होते. केवळ पब्लिसिटीसाठी ती नानाजींवर आरोप करतेय.

- Advertisement -

वाचा : तनुश्री PSYCHO; पब्लिसिटीसाठी नानावर आरोप – राखी सावंत

तनुश्री भिकारी झाल्याच तिनं म्हटलं 

अग वेडे आमच्या मराठ्यांना तू इथे येऊन शिव्या देणार. नानाजींनी तुला सोडलं, मनसेने तुला सोडलं, राज ठाकरेजींनी सोडलं… राखी सावंत तुला सोडणार नाही. तुला दाखवणार मराठी मुलगी काय करू शकते. फक्त लोकं बॉलीवूडलाच बदनाम करतात. बी, सी ग्रेड सिनेमांमध्ये अशा गोष्टी घडतात. मी असं नाही म्हणणार की नाही घडतं. पण तू दहा वर्षानंतर तू आलीए. अमेरिकेवरून, तुला कोणी विचारत नाही, तुझाकडे काम नाही, तुझा बँकेत पैसे नाही, तू एक नंबरची भिकारी झाली आहेस, मग तुला वाटलं की अस बोलून कॉन्ट्रव्हर्सी करते, म्हणजे काम भेटेल. अस केलं तर अगं वेडे तुला कोणी काम देईल का. निर्मात्याच नुकसान होऊ नये म्हणून मी हे गाणं केलं. आता जे कलाकार तनुश्रीच्या बाजूने बोलत आहेत, ते तिला पाठींबा देत नसून केवळ तिला सहानुभूती दाखवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -