‘या’ गावामध्ये उंदीर नाही, तर माणसं राहतात बिळात!

‘या’ गावामध्ये उंदीर नाही, तर माणसं राहतात बिळात!

आपलं घर अलिशान बंगल्याप्रमाणे असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुख सुविधांनी सज्ज आणि आरामदायक घरात राहायला कोणाला नाही आवडणार? आजघडीला सामान्यातला सामान्य माणूसही आपलं घर सुव्यवस्थि ठेवण्यासाठी धडपडत असतो. मात्र, आपण आज अशा गावाविषयी पाहणार आहोत, जिथं लोकांना बिळात राहायला आवडंत. हो, तुम्ही अगदी व्यवस्थित वाचलं आहे. या गावांमध्ये उंदीर नाही तर, माणसं बिळात राहतात. इरानच्या कंदोवन गावात शेकडो लोक चित्रविचित्र अशा घरात राहतात. उंदरांच्या बिळांप्रमाणे यांचं घर दिसतं. आपण उंचावरून पाहिल्यास ही घरं एखाद्या बिळाप्रमाणेच वाटतात. (In these village, people live in burrows, not rats)

ही घरं भलेही विचित्र दिसत असतील, मात्र ही घरं अत्यंत आरामदायक आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये ही घरे तग धरून राहतात. या घरांमध्ये ठंडीत हिटर आणि गर्मीत एसीची गरज लागत नाही.

हेही वाचा – कुत्रा- कुत्रीच्या लग्नाच्या मिरवणुकीत 500 वराती अन् सोन्या- चांदीच्या दागिन्यांचा श्रृंगार

बिळांप्रमाणे घरं ठेवण्यामागे काही कारणं असल्याचं सांगितलं जातं. मंगोल साम्राज्याच्या अतिक्रमणापासून वाचण्यासाठी या पद्धतीची घरे बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. याठिकाणच्या पूर्वजांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीची घरे बांधली. कंदोवन गावात सुरुवातीच्या काळात मंगोलांच्या हल्ल्यांपासून वाचण्याकरता इथे लोक स्थायिक झाले होते. येथील लोक मंगोलांपासून लपण्यासाठी ज्वालामुखीच्या खडकांमध्ये आपले सुरक्षित आश्रयस्थान शोधत असत. कालानुरुप त्यांच्या घरांच्या पद्धतींमध्ये काहीच बदल झाला नाही. त्यामुळे हे गाव आपल्या आगळ्या वेगळ्या घरांच्या शैलींमुळे प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा – आंबा की पर्स? व्हायरल व्हिडिओ पाहून लोक चक्रावले

First Published on: June 7, 2022 8:44 PM
Exit mobile version