या मूर्खपणाला म्हणायचं काय? बेशिस्तपणाचा कळस आहे हा!

या मूर्खपणाला म्हणायचं काय? बेशिस्तपणाचा कळस आहे हा!

रेल्वे क्रॉसिंग

दसऱ्याच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या किमान १०० जणांना चिरडत एक ट्रेन गेल्यानंतर या घटनेवर मोठी चर्चा सुरू झाली होती. यात नक्की कुणाची चूक होती, प्रवाशांची की रेल्वेचालकाची? असे प्रश्नही विचारले गेले. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवरून तरी प्रवाशांनी अशा प्रकरणात जास्त जबाबदारीने वागायला हवं, हेच दिसून येत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, हे जरी नक्की कळत नसलं, तरी व्हिडिओत दिसणाऱ्या लोकांच्या वेशभूषेवरून हा व्हिडिओ राजस्थान किंवा मध्यप्रदेशमधला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र व्हिडिओमध्ये दिसणारं वास्तव लोकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारं आहे.

रेल्वे चालकाचं यात काय चुकलं?

एका रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये समोर एक ट्रेन ट्रॅकवर थांबली असल्याचं दिसतंय. पुढे जाण्यासाठी रेल्वे चालक वारंवार हॉर्न वाजवतोय. पण ट्रॅक ओलांडणारी माणसं त्याच्या हॉर्नकडे लक्ष न देता ट्रॅक ओलांडतच आहेत. एक-दोनदा तर आजूबाजूच्या एकादोघांनी ट्रेनला जाण्यासाठी ट्रॅक रिकामा केला देखील. ट्रॅक क्रॉस करणाऱ्यांना अक्षरश: विनवून त्यांनी थांबवलं. पण जशी ट्रेन पुढे सरकली, तसे अचानक मध्येच बाईकवाले किंवा पायी चालणारी लोकं घुसली आणि ट्रॅक ओलांडला. शेवटी मोठ्या प्रयत्नांनी रेल्वे चालकाच्या मदतनीसांनी या ‘घुसखोरां’ना आवरलं आणि ट्रेनला जाण्यासाठी वाट मिळाली!


तुम्ही हे वाचलंत का? – अमृतसर येथे ‘रावणा’ने वाचवले आठ जणांचे प्राण


अमृतसर दुर्घटनेत ६१ बळी

दसऱ्याच्या दिवशीच पंजाबच्या अमृतसरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम रेल्वे ट्रॅकवरच उभं राहून पाहणाऱ्या लोकांना चिरडून एक ट्रेन पुढे गेली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमधून ट्रेनचालकाने अनेकदा हॉर्न वाजवल्याचं दिसून येत आहे. मात्र, तरीदेखील ट्रॅकवर उभी असलेली माणसं रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यात इतकी दंग झाली होती, की त्यांना ट्रेनचा हॉर्न ऐकू देखील आला नाही आणि मोठी दुर्घटना घडली. तब्बल ६१ लोकांना या दुर्घटनेमध्ये आपले प्राण गमवावे लागले असून ७०हून अधिक जण जखमी झाले. यावेळी अनेकांनी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे चालकालाच दोषी धरलं. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधून लोकांची मानसिकताही समोर येत आहे.

First Published on: October 22, 2018 9:06 PM
Exit mobile version