घरदेश-विदेशअमृतसर येथे 'रावणा'ने वाचवले आठ जणांचे प्राण

अमृतसर येथे ‘रावणा’ने वाचवले आठ जणांचे प्राण

Subscribe

अमृतसर येथील रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंह यांने आठ जणांचे प्राण वाचवले आहे.

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला. या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्याच दरम्यान दरवर्षी रावणाची भूमिका साकारणाऱ्या रावणाने आठ जणांचा जीव वाचवला आहे. मात्र ते स्वत:चा जीव वाचवू शकले नाही. दलबीर सिंह असे त्यांचे नाव असून ते रामलीलामधील रावणाची भूमिका साकारायचे. भारदस्त आवाजाने दरवर्षी उपस्थितांना टाळ्या वाजवायला भाग पाडणाऱ्या रावणाने आठ जीव वाचवत त्यांना जिवदान दिले आहे.

नेमके काय घडले?

पंजाबमधील अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे रावणदहनाच्या कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रेल्वेच्या रुळावर उभे होते. त्याचदरम्यान रामलीलेमध्ये रावणाची भूमिका साकारणारा दलबीर सिंह आपली भूमिका साकारुन ट्रॅकच्या दुसऱ्याबाजूला असलेल्या घरी जायला निघाला होता. त्याच दरम्यान त्यांचा मित्र राजेश देखील त्या ठिकाणी रावणाचे दहन पाहण्यासाठी उभे होते. त्यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून रावणाचे दहन पाण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान जालंधर – अमृतसर डीएमयू ही भरधाव ट्रेने येत असल्याचे दलबीर सिंह यांने पाहिले. हे पाहताच दलबीर सिंह यांने रुळावर उभे असणाऱ्या आठ जणांना धक्का त्यांचे प्राण वाचवले. मात्र या अपघातात ते स्वत:चा जीव वाचवू शकले नसल्याची माहिती त्या ठिकणा उपस्थित असलेल्या त्यांचा मित्र राजेश यांनी दिली आहे.

- Advertisement -

रावणाची भूमिका साकारणारा दलबीर

दलबीर सिंह यांच्या शेजारी राहणारे कृष्णा लाल यांनी असे सांगितले आहे की, दलबीर सिंह अनेक वर्षांपासून रामलीलामधील रावणाची भूमिका साकारत होते. त्यांचा भरदस्त आवाज असल्याने ते रावणाची भूमिका साकारायचे. ते दरवर्षी रावणाची भूमिका साकारायचे म्हणून त्यांना लंकेश बोलायचो. मात्र शुक्रवारी जे त्यांनी काम केले आहे ते एखाद्या हिरोप्रमाणे आहे.

दलबीर सिंह विषयी थोडक्यात

दलबीर सिंह याचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. दलबीर यांना आठ महिन्याचे बाळ असून त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि बाळ असा सुटुंब परिवार आहे. मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कळताच दलबीर यांच्या आईला धक्काच बसला आहे.

- Advertisement -

सुनेला नोकरी द्यावी

अचानक मुलाच्या जाण्याने संपूर्ण परिवाराची जबाबदारी आपल्या सुनेवर पडली आहे. त्यामुळे सरकारने काहीतरी करावे अशी मागणी दलबीरच्या आईने केली आहे. तसेच तिच्या पदरात आठ महिन्याचे बाळ असून सुनेला नोकरी द्यावी अशी मागणी दलबीरच्या आईने एएनआयशी बोलताना सांगितले आहे.


वाचा – अमृतसर रेल्वे दूर्घटना: मला All-Clear हिरवा सिग्नल मिळाला होता – मोटरमन

वाचा – अमृतसरमध्ये रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे आंदोलन

वाचा – अमृतसर रेल्वे दुर्घटना; ६१ जणांचा मृत्यू ७२ जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -