… आणि ती रेडिओ जाॅकी झाली !

… आणि ती रेडिओ जाॅकी झाली !

रश्मि वारंग आज एक नामांकित ‘आरजे’ म्हणजेच रेडिओ जाॅकी आहे. आकाशवाणीच्या ‘एफएम गोल्ड’ आणि ‘एफएम रेनबो’ या दोन वाहिन्यांवर रश्मि गेली बावीस वर्षे निवेदनाचे काम करते. या सोबतच खाजगी कार्यक्रमात निवेदक-सूत्रसंचालक, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, वर्तमानपत्रांतून स्तंभलेखन, आवाजाची कार्यशाळा अशा विविध क्षेत्रांतही ती अग्रेसर आहे. मराठी भाषेवरील तिचं नितांत प्रेम हे या सार्‍याच्या मुळाशी आहे. अर्थातच तिचा हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. त्यात बरीचशी आव्हानं तर होतीच पण स्त्री म्हणून या शर्यतीत बरेचसे अडथळेही आले. त्यावर तिने मातंही केली. ‘माय महानगर मानिनी’च्या निमित्ताने तिच्यासोबत स्टुडिओमध्ये गप्पा रंगल्या, ज्याद्वारे तिच्या यशाचे आलेख आपल्यासमोर तिनेच उलगडून दाखवला आहे.

First Published on: October 1, 2022 7:00 AM
Exit mobile version