सांगोल्यातील शेकापचा ५० वर्षांचा गड खालसा; देशमुखांच्या नातूचा पराभव

सांगोल्यातील शेकापचा ५० वर्षांचा गड खालसा; देशमुखांच्या नातूचा पराभव

गेली ५० ते ६० वर्ष एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीत ते १० वेळा आमदार म्हणून विजयी झाल्याने गणपतराव देशमुख यांना कायमस्वरूपी आमदार अशी देखील ओळख तेथे निर्माण झाली आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची कायमस्वरूपी आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली आहे.

पारंपारिक ५५ वर्षाचा बालेकिल्ला शिवसेनेने केला काबिज

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचा नातू अनिकेत देशमुख यांनी पहिल्यांदा ही विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यांच्या विरूद्ध ही चुरशीची लढत देण्यासाठी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील ७११ मतांनी विजय झाल्याने गणपतराव देशमुख यांचा नातू अनिकेत देशमुख यांचा दारूण पराभव झाला आहे. देशमुख यांच्या नातवाचा पराभव झाल्याने शेकापचा बालेकिल्ला तसेच पारंपारिक ५५ वर्षाचा मतदारसंघ हा शिवसेनेने काबिज केला आहे.


सांगोला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५३
First Published on: October 24, 2019 4:19 PM
Exit mobile version