पुन्हा भाजपचे सरकार, ५०-५० चा शब्द दिलेला नाही – फडणवीस

पुन्हा भाजपचे सरकार, ५०-५० चा शब्द दिलेला नाही – फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कदाचित यावेळी अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या. मात्र निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी जी पहिलीच पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले की सरकार बनवण्याबाबत आमचे सर्व मार्ग मोकळे आहेत. ते ऐकून आम्हाला धक्का बसला, असे त्यांनी का म्हटले असावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. मी मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की महायुतीचेच सरकार असेल. मात्र, गेले १५ दिवस ज्या प्रकारचे वक्तव्य माध्यमातून पाहायला मिळाले. खरंतर अडीच वर्षांचा जो विषय आहे. माझ्यासमोर कधीही अडीच वपर्षांच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता. किंबहुना बोलणी फिसकटली होती. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली तेव्हा निर्णय झाला नव्हता. म्हणूनच दिवाळीला बोलणी झाली तेव्हा मी सांगितले होते की, अमित शहा यांना त्याबाबत माहिती असेल. मी त्यांना आणि गडकरींना विचारले तर त्यांनी नाही सांगितले. भाजपने कुणाला खोटे ठरवण्यासाठी भूमिका मांडलेली नाही. जे काही आहे ते चर्चेतून होते. परंतु, आम्ही चर्चा घेणार नाही, अशी भूमिका… गेले पाच वर्ष उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे चांगले संबंध होते आणि यापुढेही असतील. परंतु, मी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. चर्चेची दारे आमच्याकडून खुले होती, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. युती तुटली असं मी म्हणणार नाही. मात्र गैरसमज दूर झाल्यास पुन्हा महायुती सत्तेत येईल.

काय म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचा –

आमच्याशी चर्चा करायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी रोज चर्चा करायला वेळ आहे आणि आमच्याशी चर्चा होत नव्हती. कदाचीत पहिल्याच दिवशी ही मानसिकता झाली होती की, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जावे. शरद पवार यांनी युतीचे सरकार स्थापन करावे, असे सांगितले आहे. आम्ही सातत्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपसोबत चर्चा करायचे नाही, ते धोरण योग्य नाही. गेले पाच वर्ष काढले आहे, त्यामुळे कुठळेही टीका करणार नाही. त्यांच्या अजूबाजूच्या लोकांनी जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्यातून असे समजू नका की आम्ही उत्तर देऊ शकत नाही. त्यापेक्षा आम्ही जास्त प्रखर भाषेत आम्ही उत्तर देऊ शकत नाही.

आम्ही जोडणारी लोकं आहोत. भाजपच्यावतीने कधीही आम्ही विचार करु शकत नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदारातिथ्य आहेत. पण २०१४ साली आम्ही वेगळे लढलो तेव्हा आम्ही विरोधात बोलले नाही. मात्र गेल्या दहा दिवसांत शिवसेनेने खालच्या स्थरावर टीका केली. फक्त वृत्तपत्र नाही तर त्याबाहेर जाऊन टीका केली. विरोधकांकडून टीका समजू शकतो परंतु, सरकार स्थापन करायचे आहे. त्या पक्षाकडून आमच्या नेत्यांवर टीका होते. जगाने ज्या मोदीजींचे नेतृत्व मान्य केले. त्या मोदीजींची टीका केली ते दुर्दैवाने विरोधी पक्षानेही केली नाही. त्यामुळे ही बाब आमच्या मनाला लागलेली गोष्ट आहे. मोदींबद्दल असे शब्द वापरणे सुरु असेल तर असे सरकार का चालवायचे असा प्रश्न पडतो.

ही क्रिटिकल वेळ आहे. याचे कारण महाराष्ट्रात अतिशय चांगले पीक असताना प्रचंड मोठ्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. अशावेळी सरकार निर्माण होणे आवश्यक होते. आज सरकार स्थापन झाले असते तर कदाचित चांगले निर्णय घेतले गेले असते. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी मला काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याचे सांगितले आहे.

एक मोठा जनादेश दिल्यानंतर त्याचा अनादर होता कामा नये. जनतेवर निवडणूक लादणे चुकीचे आहे. राज्यात नवीन निवडणूक लादण्याऐवजी नवीन सरकार यायला हवे. काही लोकं जाणीवपूर्वक भाजपवर आमदारांना फोडायेच आरोप करत आहेत. माझे त्यांना खुले आवाहन आहे, तसे पुरावे दाखवावे अन्यथा माफी मागावी. सरकार तयार करताना कोणतेही फोडफोडीचे राजकारण आम्ही करणार नाही. मला विश्वास आहे येत्या काळात जे सरकार बनेल ते भाजपच्याच नेतृत्वात बनेल. महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आभार मानतो. मात्र जनतेसाठी सरकार स्थापन करु शकलो नाही याची खंतही आहे. पत्रकार आणि विरोधी पक्षांचेही आभार मानतो. ते आमचे शत्रू नाहीत, आमचा वैचारीक विरोध आहे.

First Published on: November 8, 2019 5:43 PM
Exit mobile version