मोदींची उदयनराजेंसाठी साताऱ्यात पहिली सभा

मोदींची उदयनराजेंसाठी साताऱ्यात पहिली सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदीं

भाजपाच्या उमेदवारी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: साताऱ्यात आपली पहिली जाहिर सभा घेणार आहेत. मोदींची ही पहिली सभा पश्चिम महाराष्ट्रात होणार असून येत्या १३ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेचा मूहुर्त साधत सैनिक स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर १७ ऑक्टोबरला पुण्यात देखील जाहिर सभा घेतली जाणार आहे. यामुळे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बाल्लेकिल्यात होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशा होणार सभा

सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेची निवडणूक अशा दोनही निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणूका भारतीय जनता पक्षाने अधिकच गांभीर्याने घेतल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तब्बल ९ सभा घेण्याचे ठरवले आहे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकूण १८ सभा घेणार आहेत.

भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या चार जागा जिंकण्यासाठी भाजपाने चांगलीच रणनिती अवलंबली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाने अखेरच्या टप्प्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत वातावरण बदलण्याची तयारी केली आहे. तसेच साताऱ्यात मोदींची सभा झाल्यास सातारा लोकसभेसह विधानसभा निवडणुक सोपी होईल, अशी अपेक्षा भाजपाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे मोदींनी आपली पहिली सभा ही साताऱ्यात घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा – चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यावरून ब्राह्मण महासंघातच फूट!


 

First Published on: October 6, 2019 5:10 PM
Exit mobile version