खान्देशात भाजपचा वरचष्मा कायम !

खान्देशात भाजपचा वरचष्मा कायम !

रावेर लोकसभा मतदार संघांतील ५ विधानसभा क्षेत्रांवर भाजपचा आमदार असून एका मतदार संघात शिवसेनेचा आमदार आहे. या संपूर्ण लोकसभा मतदार संघावर भाजपचे अधिराज्य आहे. एकेकाळी एकनाथ खडसे यांचा राजकीय वर्चस्व मानले जाणार्‍या खान्देशातून २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली. फडणवीस सरकारच्या या टर्ममध्ये पहिले दोन वर्षे म्हणून एकनाथ खडसे यांनी दुसर्‍या क्रमांकाचे स्थान होते, मात्र त्यानंतर खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खडसे सत्तेच्या राजकारणातून बाहेर पडले आणि त्यांची जागा गिरीश महाजन यांनी घेतली.

राज्याच्या राजकारणात वर्षभरापासून महाजनर यांनी मजबूत पकड घेतली आहे. आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीत खान्देशातील राजकारण महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली चालवले जाईल, अशी स्थिती आहे. भाजपचे वजनदार नेते आणि संकटमोचक, आरोग्यदूत अशी ओळख निर्माण करणार्‍या गिरीश महाजन यांचा इथेच जामनेर हा मतदारसंघ आहे. भाजपात मेगा भरती घडवून आणण्यात महाजनांनी महत्वाची भूमिका बजावली. या मतदारसंघात त्यांची निवडणूक लढविण्याची ही सहावी वेळ आहे.

जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांनी एकहाती वर्चस्व कायम ठेवलेले आहे. महाजन सध्या राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री असून जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ‘वोटबँक’ मजबूत करून ठेवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते फोडण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असल्याचेही चित्र या मतदारसंघात आहे.

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांना पुन्हा उमेदवारी देणार कि त्यांना दिल्लीत पाठवणार याविषयी अद्याप निश्चित झालेले नाही. कारण तसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते. जरी या ठिकाणी भाजपने उमेदवार बदलला तरी भाजपचा विजय निश्चित आहे. तसेच रावेर, भुसावळ आणि मलकापूर या मतदार संघांमध्येही भाजपचे विद्यमान आमदार मजबूत असून त्यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच तिथेही भाजप मजबूत आहे. २०१४ला युती तुटलेली असतानाही भाजपचे ४ आमदार निवडून आले होते, त्यामुळे जरी २०१९ला जरी युती झाली किंवा तुटली तरी भाजपला फरक पडणार नाही.

चोपडा – चंद्रकांत सोनावणे – शिवसेना – ५४, १७२
रावेर – हरिभाऊ जावळे – भाजप – ६५,९७२
भुसावळ – संजय सावकारे – भाजप – ८७,८१८
जामनेर – गिरीश महाजन – भाजप – १०३, ४९८
मुक्ताईनगर – एकनाथ खडसे – भाजप – ८५, ६५७
मलकापूर – चैनसूख संचेती – भाजप – ७५, ९६५

First Published on: September 24, 2019 6:01 AM
Exit mobile version