कडकनाथ कोंबडी आंदोलन प्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस

कडकनाथ कोंबडी आंदोलन प्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना तडीपारची नोटीस

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना तडीपाराची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजले. याप्रकरणी हे आंदोलन करणाऱ्यांना तडीपाराची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासोबत वाळावा तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांच्या देखील नावांचा समावेश आहे.

हेही वाचा – आज राज ठाकरे यांच्या भाषणात ‘हे’ मुद्दे असण्याची शक्यता

काय आहे नेमके प्रकरण?

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा सुरु होती. या महाजनादेश यात्रेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर दौरा केला. मात्र, त्यांची ही महाजनादेश यात्रा जेव्हा सांगलीच्या दिशेला गेली तेव्हा त्यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी कोंबड्या फेकल्या. हे आंदोलक स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते होते. कडकनाथ कोंबड्या व्यवसाय घोटाळ्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन त्यांच्या चांगलेच आंगलटी आले आहे. कारण त्यांच्या विरोधात तडीपाराची नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा – हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे – एकनाथ खडसे

काय आहे कडकनाथ कोंबडी घोटाळा?

सांगलीतील इस्लामपूर येथील रयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीने कडकनाथ कोंबडी व्यवसायाच्या नावाखाली शेतकर्‍यांकडून पैसे घेऊन त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केले. याकंपनीत वसई आणि पालघर जिल्ह्यातील नऊ शेतकर्‍यांनी ३३ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवून या शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली आहे.

First Published on: October 9, 2019 1:04 PM
Exit mobile version