‘बंद दाराआड झालेली चर्चा शहांनी मोदींना सांगितली नाही, म्हणून गोष्टी बिघडल्या’

‘बंद दाराआड झालेली चर्चा शहांनी मोदींना सांगितली नाही, म्हणून गोष्टी बिघडल्या’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित होते. (फोटो - राजेश वराडकर)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी लिलावती हॉस्पिटलमधून परतल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत 

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आम्हाला नेहमीच आदर वाटला आहे. तो पुढेही कायम राहणार आहे. मात्र ठाकरे आणि मोदींचे नाते कुणालाही पाहवत नाही. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण केला जात आहे. शहांसोबत काय चर्चा झाली ही त्यांनी निवडणुका होईपर्यंत मोदींना का सांगितली नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेने राजकारणाचा कधीही व्यापार केला नाही. आमच्यावर धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

First Published on: November 14, 2019 10:58 AM
Exit mobile version