मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे – शिवसेना

मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे – शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत सभा घेतली होती. या सभेत त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षावर टीका केली होती. महाराष्ट्राचे सरकार निष्क्रिय आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील युतीचे सरकार निष्क्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वत: किती क्रियाशील आहात याचाही हिशोब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – अब की बार २२२ पार; भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनींचा विश्वास

‘…तर जनताजनार्दन निर्णय घेईल’

‘ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचाराला हात लावीत नाहीत त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत, पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवर पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार निष्क्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वत: किती क्रियाशील आहात याचाही हिशोब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वत;च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निष्क्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

First Published on: October 15, 2019 9:52 AM
Exit mobile version