Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenMoog Dal Halwa : पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीचा हलवा

Moog Dal Halwa : पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीचा हलवा

Subscribe

'मूग डाळीचा हलवा' रेसिपी

लवकरच श्रावण महिना सुरु होईल. श्रावण महिना म्हटला की, सण-समारंभाप्रमाणे गोड खाण्याचे दिवसही सुरू होतात. अशावेळी काय खावे असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावण स्पेशल अशी गोड रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • 2 वाट्या मूग डाळ
  • 2 वाट्या साखर
  • 3 वाट्या दूध
  • 1 वाटी तूप
  • 150  ग्रॅम खवा
  • 7-8 वेलदोड्याची पूड
  • 25 ग्रॅम बेदाणा
  • थोडा पिवळा रंग

कृती

Moong Dal Halwa | Moong Dal Sheera | Soaked Moong Dal Halwa Recipe | Easy  Sweet Recipes | Gomathi's Kitchen & Lifestyle: Recipes and Growth

- Advertisement -
  • सर्वप्रथम मूगाची डाळ 3 ते 4  तास भिजत घालावी. ती चांगली भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये रवाळ वाटावी.
  • वाटलेल्या डाळीत 2 वाट्या दूध घालून कालवावे आणि तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे.
  • चांगले परतल्यावर त्यात थोडा रंग घालावा आणि नंतर साखर घालून चांगले परतत रहावे.
  • मिश्रण जरा घट्ट झाले कि गॅस बंद करुन उतरावे. आता त्यात बेदाणा आणि वेलचीपूड घालावी आवडत असल्यास काजू पिस्त्याची काप घालू शकता.
  • खव्यामध्ये 1 वाटी दूध घालून सारखा करावा आणि खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा आणि सर्व्ह करताना मूगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्ह करावा.

हेही वाचा :

Shravan Special 2023 : श्रावणात असे बनवा गुळपापडीचे लाडू

- Advertisment -

Manini