घरमहाराष्ट्रगुंतवणूक, शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

गुंतवणूक, शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe
मुंबई : राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) उद्यापासून (17 जुलै) सुरू होत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसमधील (NCP) काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विरोधकांची ताकद कमी झाल्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजेल की नाही अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार (Boycott of tea ceremony) घालताना पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले. या आरोपांना चहापानांतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. (What is Maharashtra’s rank in investment, education? Fadnavis explained before the session)

एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार आलं तेव्हा उद्योग पळवले जात असल्याचा आरोप केला जात होता. परंतु या सरकारच्या वर्षभराच्या एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. इंडिया टुडे गृपने यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 2.38 लाख कोटी रुपये गुंतवणूक आहे. कर्नाटक 81 हजार कोटी, गुजरात 74 हजार कोटी आणि उत्तर प्रदेश 48 हजार कोटी रुपये गुंतवणूक आहे. कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे आकडे एकत्र केले तरी महाराष्ट्राची गुंतवणूक ही जास्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर जनतेचा विश्वास आहे. उद्योग क्षेत्राचा विश्वास आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिक्षणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पत्राचा उल्लेख करताना सांगितले की, शिक्षणात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण दहा श्रेणी केल्या आहेत. त्यात पहिल्या पाच श्रेणीमध्ये कुठलंही राज्य ठेवण्यात आलं नाही. सहाव्या श्रेणीत चंदीगड आणि पंजाब आहे, त्यानंतर सातव्या श्रेणीत महाराष्ट्र आहे. याचा अर्थ महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपसोबत न जाता पुरोगामी भूमिका घेऊन पुढे जाऊ, संघर्ष करु-शरद पवार

कायदेशीर सरकार असंविधानिक म्हणण्याचं काम

खरं म्हणजे अजूनही विरोधी पक्ष या माणसिकतेतून निघालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला असताना एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीमध्ये निर्माण झालेल्या संस्थांनी ज्या सरकारला पूर्णपणे कायदेशीर आणि पात्र ठरवलेलं आहे. अशा सरकारला बेकायदेशीर आणि असंवैधानिक म्हणण्याचं जे काम चाललेलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -