Wednesday, May 1, 2024
घरमानिनीNegative Thinking : निगेटीव्ह विचारांमुळेही होते अंगदुखी

Negative Thinking : निगेटीव्ह विचारांमुळेही होते अंगदुखी

Subscribe

आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार (negative thoughts) हे त्याच्या जीवनातील समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नकारात्मक विचार बदलण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुम्ही कसे विचार करता हे समजून घेणे. जाणून घेऊया नकारात्मक विचारांमुळे आपण आजारी पडू शकतो का? आणि जाणून घ्या नकारात्मक विचार कसा टाळता येईल?

नकारात्मक विचार आजारी बनवू शकतो का?

हेल्थलाइननुसार, आपल्या शरीरातील बाह्य जखमांवर सहज उपचार करता येतात. बोटाला दुखापत झाल्यास, अँटी-बॅक्टेरियल क्रीम ताबडतोब वापरली जाऊ शकते. पण, मानसिक समस्या असतात, ज्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईपर्यंत तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते. नकारात्मक विचार आपल्याला आजारी बनवू शकतो. नकारात्मक विचारांमुळे चिंता, नैराश्य, तणाव यांसारख्या समस्या निर्माण होतात. जर समस्या जास्त वाढली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. तणाव हे मधुमेह, हृदयाच्या समस्या इत्यादींचे प्रमुख कारण मानले जाते.

- Advertisement -

रोगप्रतिकारशक्ती

जर तुम्ही दीर्घकाळापासून तणावात आहात तर त्याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर होऊ शकतो. यामुळं सतत सर्दी आणि तापामुळं आजारी पडू शकतात. स्ट्रेस हार्मोन इम्यून सिस्टम कमकुवत करते.

तणाव

तणाव आणि चिंता यामुळं भावनिकदृष्ट्या तो व्यक्ती कमजोर होतो. यामुळं डिप्रेशन येऊ शकते. तणावात असलेला व्यक्ती अनेकदा चिंतेत दिसून येतो. त्यामुळं तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो.

- Advertisement -

थकवा

तणावामुळं शारिरीक लक्षणांमध्ये थकवा येणे हे सुद्धा एक लक्षण आहे. तणावात असलेला रुग्ण थोडंस काम केल्यानेही लगेचच थकतो.

नकारात्मक विचार कसे टाळायचे?

  • स्वत:ला व्यस्त ठेवा त्यामुळे आपण स्वत:ला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणे महत्वाचे ठरते.
  • आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचार करणारे, किंवा इतरांबद्दल वाईट बोलणारे, चहाड्या करणारे जे लोक असतील त्यांच्यापासून दूर रहावे.
  • झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. अशा वेळी अधिक नकारात्मक विचार मनात येतात. त्यामुळे पुरेशी व शांत झोप घेणे महत्वाचे ठरते.
  • तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दररोज 25 मिनिटे आपल्या आवडीची गाणी किंवा संगीत ऐकल्याने पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे रोज थोडा वेळ तरी आवडीचे संगीत ऐकावे.
  • तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा. काहीतरी सकारात्मक विचार करा.
  • स्वतःचे मित्र व्हा आणि आपल्या जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
  • मेडिटेशन करा.
  • आपले विचार शेअर करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  Best places to chill out : फ्रेंडस् सोबत या ठिकाणी करा चील आऊट

_____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini