Thursday, May 16, 2024
घरमानिनीJyoti Ratre: देशातील ज्येष्ठ महिला गिर्यारोहक ज्योती रात्रे यांची कहाणी

Jyoti Ratre: देशातील ज्येष्ठ महिला गिर्यारोहक ज्योती रात्रे यांची कहाणी

Subscribe

ज्या वयात सांधेदुखीसाऱख्या आजारांनी महिला त्रस्त होतात त्या वयात ज्योतीने केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर जगातील सर्वात उंच असलेला माऊंट एलब्रुस सर केला आहे.  

बछेंद्री पाल हीने माऊंट एवरेस्ट सर करत देशाचे नाव जगभरात अजरामर केले. महिलादेखील माऊंट एवरेस्ट सारखा कठीण पर्वत सर करू शकतात हे या घटनेमुळे अधोरेखित झाले. आता याच य़ादीत भोपाळच्या ज्योती रात्रे या ५० वर्षीय महिलेचा समावेश झाला आहे. ज्या वयात सांधेदुखीसाऱख्या आजारांनी महिला त्रस्त होतात त्या वयात ज्योतीने केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर जगातील सर्वात उंच असलेला माऊंट एलब्रुस सर केला आहे.

- Advertisement -

ज्योती भोपाळची असून शाळेत असताना शिक्षकांनी एकदा सांगितले होते की माऊंट एवरेस्ट सर करणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे. भारतात फक्त काही पुरुषच माऊंट एवरेस्टवर पोहचले असून महिलांचे यात प्रमाण नगण्य आहे. शिक्षकाचे हे शब्द ज्योतीच्या मनावर कोरले गेले. तिने तेव्हापासूनच माऊंट एवरेस्टवर जाण्याचे स्वप्न पाहावयास सुरुवात केली. पण तरुण वयात तिचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. शाळा, कॉलेज आणि नंतर लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये ज्योती अडकली. पण मुलं मोठी झाल्यावर तिने वयाच्या ४८ व्या वर्षी गिर्य़ारोहण शिकण्यास सुरुवात केली. सर्वात आधी तिने मनालीला जाऊन गिर्यारोहणाचे ट्रेनिंग घेतले. नंतर तिने चार दिवसाची अमरनाथ यात्रा दोन दिवसात पूर्ण केली.

प्रोफशनल ट्रेनिंग घेतल्यानंतर तिने माऊंट एवरेस्टसाठी अर्ज केला. पण तिच वयं पाहता तिचा अर्ज नाकारण्यात आला. कारण माऊंट एवरेस्टवर चढण्यासाठी जास्तीत जास्त वयाची मर्यादा ४२ वर्ष आहे. पण ज्योतीने हार न मानता ट्रेनिंग सुरूच ठेवले. नंतर तिने युरोपचे सर्वात उंच पर्वत माऊंट एलब्रुसवर चढण्यासाठी अर्ज केला. तिचा अर्ज मान्य करण्यात आला. चार जणांच्या टीममध्ये ज्योतीचा समावेश होता. तिने यशस्वीपणे माऊंट एलब्रुस सर केला. या रेकॉर्डनंतर देशातील एकमेव ज्येष्ठ महिला गिर्यारोहक अशी ज्योतिची ओळख झाली.

- Advertisment -

Manini