Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeMonsoon Recipe : Healthy आणि टेस्टी ओव्याची भजी

Monsoon Recipe : Healthy आणि टेस्टी ओव्याची भजी

Subscribe

ओव्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतो. सर्दी-खोकला, कफ इत्यादी समस्यांवर घरगुती उपाय म्हणून ओव्याच्या पानांचा उपयोग केला जातो. आयुर्वेदिक औषधोपचाराप्रमाणेच काही जण या पानांचा स्वयंपाकामध्येही समावेश करतात. ओव्याच्या पानांपासून तयार केलेली भजी देखील चविष्ट तसंच आरोग्यासाठी पौष्टिकही आहे.

साहित्य

- Advertisement -
  • 1 वाटी बेसन पीठ
  • 2 चमचे तांदळाचे पीठ
  • ओव्याची पाने
  • 2 चमचे तिखट
  • मीठ
  • 2 चमचे धने जिरे पावडर
  • चिमुटभर सोडा

कृती-

- Advertisement -
  • बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, धने जिरे पावडर एकत्र करून घ्या.
  • आता ओव्याचे एक एक पान या सगळ्या मिश्रणात बुडवून घ्या.
  • यानंतर तेल गरम झाल्यावर ओव्याची पाने घाला आणि छान तळून घ्या.
  • आता गरम गरम हेल्दी आणि टेस्टी ओव्याची भजी सर्व्ह करा.

_______________________________________________________________________

हेही वाचा :

Recipe : नाश्त्यासाठी बनवा मुगडाळीचे मूग्लेट्स

 

- Advertisment -

Manini