घरमनोरंजनभारतीय चित्रपट केवळ हिप्स... धक्कादायक विधानानंतर प्रियंका होतेय ट्रोल

भारतीय चित्रपट केवळ हिप्स… धक्कादायक विधानानंतर प्रियंका होतेय ट्रोल

Subscribe

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रियंकाने नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने व्यक्त होताना दिसते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडमधील संघर्षाबाबत आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या होत्या. दरम्यान, अशातच प्रियंकाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंकाचा हा जुना व्हिडीओ पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत.

प्रियंका चोप्राने केलं धक्कादायक विधान

नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असणारी देसी गर्ल सध्या तिच्या एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. खरंतर, या व्हिडीओमध्ये 68व्या एमी अवॉर्ड्सदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहे. जिथे ती हिंदी चित्रपट आणि बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका म्हणतेय की, भारतीय चित्रपट केवळ हिप्स आणि बूब्बबद्दल असतात. त्यानंतर ती एक डान्स स्टेप देखील करताना दिसते. या व्हायरल व्हिडीओतील प्रियंकाचं हे विचित्र विधान ऐकून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. शिवाय अनेकजण तिला म्हणत आहेत की, “तुला भारतीय चित्रपटांमुळेच ओळख मिळाली आणि आज तू संपूर्ण जगासमोर भारतीय चित्रपटांची खिल्ली उडवत आहे.”

- Advertisement -

या चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.

 


हेही वाचा :

जपानमध्ये शाहरुखचा ब्लॉकबस्टर ‘पठाण’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -