Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthबुद्धीमान मुलं होण्यासाठी प्रेग्नंट महिलांनी अशी घ्यावी काळजी

बुद्धीमान मुलं होण्यासाठी प्रेग्नंट महिलांनी अशी घ्यावी काळजी

Subscribe

प्रत्येक आईला आपले बाळ सुंदर , गोंडस आणि हुशार असावे असे वाटत राहते. त्यासाठी ती प्रयत्न ही करत राहते. अशातच बुद्धीमान मुलं हवं असेल तर महिलेने आरोग्याची काळजी घ्यावीच. पण त्याचसोबत आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल जाणून घेऊयात. (Tips for pregnant women)

जर तुम्हाला बुद्धीमान मुलं हवं असेल तर तुम्ही प्रेग्नेंसी सुरु झाल्यानंतर ते बाळ जन्माला येई पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. विज्ञानानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रेग्नेंसीपूर्वी सुद्धा तुम्ही सुरु करू शकता. यामुळे बुद्धीमान आणि हुशार बाळं जन्माला येऊ शकते.

- Advertisement -

-अॅक्टिव्ह रहा
हेल्दी राहण्यासाठी शरिर अॅक्टिव्ह असणे आणि व्यायाम करणे फार गरजेचे आहे. ऐवढेच नाही तर काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुद्धा सुधारली जाते. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 30 मिनिटं तर वॉक करा.

अंडी आणि मासे
अंड्याचा पिवळा भाग कोलाइन युक्त असतो. जर प्रेग्रेंसी दरम्यान याचे सेवन केल्यास तर बाळाची स्मरणशक्ती आणि बौद्धीक क्षमता उत्तम होते. काही रिसर्चमधून असे समोर आले आहे की, ओमेगा-3 फॅटी अॅसिड सुद्धा तुमच्या मेंदूच्या विकासासाठी बेस्ट ऑप्शन मानला जातो. जर तुम्ही प्रेग्नेंसीपूर्वी मासे आणि अंडी खाल्ली तर प्रेग्नेंसीमध्ये याचा फार फायदा होऊ शकतो.

- Advertisement -

-अल्कोहोल आणि निकोटीनपासून दूर रहा
जेव्हा तुम्ही बेबी प्लॅनिंग करता तेव्हापासून ते डिलिवरी पर्यंत निकोटीन किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये. अन्यथा बाळाच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

-पुरेशी झोप घ्या
झोप पूर्ण न झाल्याने बहुतांश प्रेग्नेंट महिलांना इनसोमनिया होतो. अशातच प्रेग्रेंसीमध्ये बेबी बंपसह रात्रभर एकाच पोजीशनमध्ये झोपणे मुश्किल होऊ शकते. त्यामुळे आरामदायी पोजीशनमध्ये तुम्ही झोपा.

-स्वत:ला तयार करा
तुम्हाला ही कळते की, प्रेग्नेंसीचा नऊ महिन्याचा प्रवास हा कठीण असणार आहे. त्यामुळे स्वत:ला मानसिक आणि शारिरीक रुपात तयार करावे. यासाठी तुम्ही योगा किंवा पौष्टिक आहाराचे सेवन करा.

- Advertisment -

Manini