Wednesday, February 28, 2024
घरमानिनीReligiousशास्त्रानुसार कोणत्या बोटाने कपाळावर टिळा लावावा?

शास्त्रानुसार कोणत्या बोटाने कपाळावर टिळा लावावा?

Subscribe

हिंदू धर्मात कपाळावर टिळा(टिकली) लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पुरातन काळापासून ते आताच्या एकविसाव्या शतकापर्यंत अनेक लोक या परंपरेचं प्रकर्षाने पालन करतात. दररोज कपाळावर टिळा लावणं भाग्यकारक मानलं जातं. तसेच यामुळे कुंडलीतील ग्रहांचे दुष्प्रभाव देखील कमी होतात. परंतु कापळावरचा टिळा नक्की कोणत्या बोटाने लावावा? याचा फारसा कधी कोणी विचार करत नाही. परंतु हाताच्या वेगवेगळ्या बोटांनी कापळावर टिळा लावण्याचे विविध फायदे आहेत.

कपाळावर कोणत्या बोटाने टिळा लावावा?

Which Finger Can Be Used To Put Tilak?

- Advertisement -
  • हाताच्या पाचंही बोटांवर विविध ग्रहाचे वर्चस्व असते. शास्त्रानुसार, कोणत्याही शुभ कार्यात किंवा देवपूजेमध्ये अनामिकेने (करंगळीच्या बाजूचे बोट) टिळा लावला जातो. या बोटावर सूर्याचा प्रभाव असतो. या बोटाने टिळा लावल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसेच मानसिक शांती प्राप्त होते.
  • मध्यमावर शनी ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे या बोटाने टिळा लावल्याने प्रत्येक कामात यश प्राप्त होते.
  • अंगठ्याने टिळा लावण्याचेही अनेक फायदे आहेत. शास्त्रानुसार अंगठ्याने टिळा लावल्याने आरोग्य, यश, शक्ती प्राप्त होते. अंगठ्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. पूर्वीच्या काळी युद्धावर जाताना राजाला अंगठ्याने टिळा लावला जायचा. यामागे राजाला यश, शक्ती प्राप्त व्हावी असा हेतू असायचा.
  • तर्जनीवर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. शास्त्रानुसार, या बोटाने टिळा लावल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे या बोटाने केवळ मृत व्यक्तीलाच टिळा लावला जातो. जिवंत व्यक्तीने टिळा लावण्यासाठी या बोटाचा वापर करु नये.
  • करंगळीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. परंतु, शास्त्रानुसार करंगळीने टिळा लावला जात नाही. त्यामुळे या बोटाचा टिळा लावण्यासाठी कधीही वापर करु नये.

 


हेही वाचा :

श्रीरामांचे ‘हे’ 3 सोपे मंत्र आहेत खूप प्रभावी; जप करताच होते इच्छापूर्ती

- Advertisment -

Manini