Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousशुक्रवारी 'या' चुका केल्याने देवी लक्ष्मी होते नाराज

शुक्रवारी ‘या’ चुका केल्याने देवी लक्ष्मी होते नाराज

Subscribe

हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार विविध देवी-देवता आणि ग्रहांना समर्पित केलेला आहे. प्रत्येक वारानुसार केलेले उपाय आणि नियम महत्वपूर्ण मानले जातात. जेणेकरुन त्या ग्रहांचे आणि देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. शुक्रवार हा दिवस श्री लक्ष्मीला समर्पित आहे. शास्त्रात शुक्रवारी काही गोष्टी करण्यास मनाई केली आहे. कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात. देवी लक्ष्मी नाराज झाल्यास तुम्हाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो.

शुक्रवारी कधीही करु नये ‘या’ चुका

What Is The Correct Way To Place Goddess Lakshmi's Photo Or Idol At Home? - News18

- Advertisement -
  • घर अस्वच्छ ठेवू नये

घरात नेहमी स्वच्छता ठेवावी. ज्या ठिकाणी स्वच्छ असते. तिथे लक्ष्मीचा वास असतो. शुक्रवारी कधीही घर अस्वच्छ ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात. यामुळे धनहानी देखील होते.

  • वाद-विवाद करु नये

ज्या घरामध्ये सतत कलह, वाद-विवाद होतात. त्या ठिकाणी देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे या दिवशी वाद-विवाद, अभद्र शब्दांचा वापर करु नये.

- Advertisement -
  • उधारी देऊ-घेऊ नये

शुक्रवारी कधीही कोणाकडून पैसे उधार घेऊ नये. तसेच कधीही कोणाला पैसे उधार देऊ नये. कारण शुक्रवारी कोणाकडून उधारी घेतल्यास कर्ज अधिक वाढते.

  • या गोष्टी खाऊ नये

शुक्रवारी कधीही दही, ताक, लोणचं, या आंबट पदार्थांचे सेवन करु नये. तसेच या दिवशी मांसाहार देखील करु नये.

  • काळे वस्त्र परिधान करु नये

शुक्रवारी काळा किंवा निळा रंग परिधान करु नये. यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो. शुक्रवारी नेहमी पांढरा, गुलाबी रंगाचा वापर करावा.

  • स्त्रियांचा अपमान करु नये

शुक्रवारी कधीही स्त्रियांचा अपमान करु नये. खरंतर नेहमीच स्त्रियांचा आदर करावा. शुक्रवारी स्त्रियांचा अपमाम केल्याने देवी लक्ष्मी नाराज होतात.


हेही वाचा :

विवाहित महिलांनी दुसऱ्यांसोबत शेअर करु नये ‘या’ 5 वस्तू

- Advertisment -

Manini