Thursday, May 9, 2024
घरमानिनीmatrimonial site frauds -मॅट्रिमोनिअल साइटवर जोडीदार शोधताना घ्यावी खबरदारी

matrimonial site frauds -मॅट्रिमोनिअल साइटवर जोडीदार शोधताना घ्यावी खबरदारी

Subscribe

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे बोलले जाते. मात्र सध्याच्या डिजिटल युगात नातेसंबंधही डिजिटली जुळू लागले आहेत. यामुळे बहुतेक जण जीवनसाथी निवडण्यासाठी अशा मॅट्रिमोनिअल साइटची मदत घेत आहेत. अर्थात, या साइट्सवर तुम्ही तुमचा अपेक्षित जीवनसाथी सहज निवडू शकता. पण मॅट्रिमोनिअल साइट्स वापरताना काही खबरदारी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. कारण गेल्या काही वर्षात अशा मॅट्रिमोनिअल वेबसाईट्स किंवा सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून लग्नाळू व्यक्तींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे जर तुम्हीही अशा मॅट्रिमोनिअल साइटवर जोडीदार शोधून लग्नाची योजना आखत असाल तर वेळीच सावध होणे शहाणपणाचे आहे.

कारण सोशल मीडियाच्या या युगात ऑनलाइन रिलेशनशिप सेट करण्याचा ट्रेंडही वाढत आहे. यात प्रामुख्याने मॅट्रिमोनिअल साइटवर काहीजण बनावट प्रोफाईल तयार करून समोरच्या व्यक्तीची फसवूक करत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यात प्रामुख्याने वेबसाइट्सवरील लग्नाच्या जाहिरातींमध्ये दिलेले तथ्य न तपासता काहीजण महत्त्वाचे निर्णय घेतात. मात्र नंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. आपला जोडीदार सुयोग्य असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण या जगात कोणीही परफेक्ट नाही अगदी तुम्हीही हे जेव्हा तुम्ही स्विकारता तेव्हाच खऱ्या अर्थाने नातेसंबंध जुळतात. यामुळे आभासी जाहीरातींना भुलून आयुष्याचे मातेरे जर करायचे नसेल तर कुठल्याही मेट्रीमेनिअल साईटवर , वृतपत्रात देण्यात आलेली वर- वधुची माहिती आंधळेपणाने खरीच असेल असे समजू नये. त्यातील तथ्य प्रत्यक्ष तपासावे. त्यासाठी अशा साईटवरून कशा प्रकारे फसवणुक केली जाते ते समजून घ्यावे. कारण फसवणूक फक्त महिलांसोबतच नाही तर पुरुषांसोबत होते. फसवणुकीच्या पद्धती जाणून घेऊया.

- Advertisement -

पहिला मार्ग

पहिला मार्ग म्हणजे संबंधित व्यक्ती तुमचा प्रोफाईल बघून वेबसाइट्सद्वारे तुमच्याशी संपर्क साधते. बऱ्याचवेळा बहुतेक प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे परदेशात राहत असल्याचा दावा करतात. संभाषण सुरू होते, मग तो कींवा ती तुम्हाला भेटवस्तू पाठवते. भेटवस्तू देखील एक किंवा दोनदा येतात. यामुळे तुमचा विश्वास बसू लागतो. मग तो तुम्हाला भारतात येण्याबद्दल सांगतो .तसेच तुझ्यासाठी एक महागडी भेट असेल असेही सांगतो. नंतर अचानक एक फोन तुम्हाला येतो की कस्टम विभागाने त्याला विमानतळावर पकडले आहे. त्याला सोडण्याच्या मोबदल्यात एवढे पैसे द्यावे लागतील असे तुम्हाला सांगितले जाते. तुम्हीही पैसे देता. त्यानंतर मात्र तो फोन नंबर आणि ती व्यक्ती गायब होते. पण तोपर्यंत तुम्हांला हजारो किंवा लाखोंचा चुना लागलेला असतो.

- Advertisement -

दुसरा मार्ग

यामध्ये फसवणूक करणारे तुमच्याशी वेबसाइट्सद्वारे संपर्क साधतात. तुमचा विश्वास जिंकल्यानंतर, ते अचानक तुम्हाला काही आणीबाणीचे निमित्त देतात आणि पैसे मागतात. तुम्ही विश्वास ठेवता आणि पैसे देता.

तिसरा मार्ग

तर काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की काहीजण फसवणूक करून लग्नही करतात. काही दिवसांनंतर, ते तुमचे पैसे आणि दागिने घेऊन पळ काढतात. यात महिलांकडून पुरुषांची आणि पुरुषांकडून महिलांची सर्वाधिक फसवणूक होते.

चौथा मार्ग

फसवणूक करणारे तुमच्याशी ऑनलाइन संपर्क साधतात. संभाषण सुरू झाल्यानंतर, तुम्हाला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले जाते. येथे तुम्हाला बेशुद्ध करून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले जाते.

काय खबरदारी घ्यावी

अशा प्रकारची फसवणूक टाळायची असेल तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवर तुमची कोणाशी मैत्री झाली असेल आणि त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले असेल, तर चॅटिंग करताना त्यांना तुमची सर्व माहिती देऊ नका. विशेषतः वैयक्तिक आणि बँकिंग माहिती देणे टाळा.
संभाषणादरम्यान समोरच्या व्यक्तीने तुम्हाला अनावश्यक प्रश्न विचारले तर तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे.

तुम्ही वैवाहिक वेबसाइटवर भेटलेल्या एखाद्याला पहिल्यांदा भेटणार असाल तर तुम्ही एकटे जाणे टाळावे.
अशा वेळी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये न भेटता सार्वजनिक ठिकाणी भेटा.

जर एखाद्या नातेसंबंधाच्या संभाषणादरम्यान समोरच्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे काही पैसे मागितले तर लगेच त्याला नकार द्या.

व्हिसा किंवा कस्टम सारख्या समस्यांमध्ये अडकलो आहोत असे सांगून कोणी पैसे मागितले तर लगेच नकार द्या आणि पोलिसांना कळवा.

वेबसाईटवर समोरच्याने दिलेली माहिती खरी आहे की खोटी ती आधी तपासून बघा.

समोरची व्यक्ती कितीही सुंदर असली तरी तिच्या बाह्यरुपाला न भुलता त्याचे खरे रूप तपासूनच पुढे जा.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली मोठी घटना आहे.

त्यामुळे जोडीदाराची निवड चुकली तर पश्चातापाशिवाय हातात काही राहत नाही.


Edited By- Aarya Joshi

- Advertisment -

Manini