घरमहाराष्ट्रBaramati Loksabha: महायुतीत तणाव! पक्षाचं ऐकत नसल्याने विजय शिवतारेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई?

Baramati Loksabha: महायुतीत तणाव! पक्षाचं ऐकत नसल्याने विजय शिवतारेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई?

Subscribe

मुंबई: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. समज देऊनही ते सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे ही कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. विजय शिवतारे हे वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे शिवतारेंनी जर युती धर्म पाळला नाही, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. (Baramati Loksabha Tension in Mahayuti Disciplinary action will be taken against Vijay Shivtare for not listening to the party Shinde Group)

शिवतारे भुमिकेवर ठाम

माझी भूमिका ठरलेली असून मी त्यावर ठाम असल्याचे विजय शिवतारे यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरही सांगितले होते. असं असूनही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणं थांबवलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीच्या उमेदवाराला धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे वरिष्ठांकडून शिस्तभंग कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तसंच, काल, गुरुवारी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला विजय शिवतारे यांनाही हजर राहण्याच आमंत्रण होतं. मात्र विजय शिवतारे गैरहजर राहिले.

अजित पवार गट आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समजावलं आहे. मात्र तरीही त्यांनी बंडखोरी केली तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.

- Advertisement -

आता शिवतारेंना वर्षावर बोलावून वारंवार समज देऊनही महायुती विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं म्हटलं जात आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांनी बोलवूनही शिवतारे गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

विजय शिवतारे हे उद्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून, तिथे ते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा: Kejriwal : आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे…, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -