Tuesday, May 21, 2024
घरमानिनीReligiousHoli 2024 : होळीपर्यंत होलाष्टकात करु नका या गोष्टी

Holi 2024 : होळीपर्यंत होलाष्टकात करु नका या गोष्टी

Subscribe

होळीच्या आठ दिवसआधी सुरु होणारे होलाष्टक 17 मार्चपासून सुरु झाले आहे. होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरु होते आणि फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या दिवशी संपते. होलाष्टक 17 मार्च ते 24 मार्चपर्यंत असणार आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. कारण होलाष्टकात सर्व ग्रह खूप उग्र असतात, अशा स्थितीत या काळात केलेले कार्य अशुभ फळ देते. त्यामुळे होळाष्टकात शुभ कर्मे केली जात नाहीत, अन्यथा शुभ कर्मांचे अशुभ फळ मिळते.

होलाष्टकात करु नये ‘ही’ कामे

होलाष्टकच्या 8 दिवसांदरम्यान लग्न, मुंडण, घर , जमीन, वाहने इत्यादी खरेदी-विक्री करण्यास मनाई आहे. या 8 दिवसात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले आहे.

- Advertisement -

होलाष्टकात काय करावे?

होलाष्टक देवी-देवतांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानले जाते. या काळात विशेषतः महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले राहते. तसेच अकाली मृत्यूची भीती देखील दूर होते.

होळी सणाचे महत्त्व

Holi 2023 Holika Dahan Date Time Muhurat Puja Vidhi News In Hindi- Holika  Dahan 2023 : ये होलिका दहन का शुभ मुहूर्त जानें पूजन विधि

- Advertisement -

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. यंदा रंगपंचमी बुधवारी खेळली जाणार आहे.


हेही वाचा :

Holi 2024 : भारताप्रमाणेच या देशांमध्येही साजरी केली जाते धुळवड

- Advertisment -

Manini