घरक्राइमPune Firing : गोळीबाराने पुणे हादरलं! हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर हल्ला; 48 तासांत...

Pune Firing : गोळीबाराने पुणे हादरलं! हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर हल्ला; 48 तासांत दुसरी घटना

Subscribe

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेला 48 तास उलटत नाहीत तोच पुन्हा एकदा जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली आहे. चाकणमध्ये हॉटेलमधील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या घटनेला 48 तास उलटत नाहीत तोच पुन्हा एकदा जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली आहे. चाकणमध्ये हॉटेलमधील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. स्वप्नील संजय शिंदे उर्फ सोप्या असे त्या व्यक्तीचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या स्वप्नीलवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. (pune firing another incident in chakan pune one person injured)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चाकण शहरापासून काही अंतरावर असलेल्या रासे फाटा परिसरातील मराठा हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या मराठा हॉटेलमध्ये स्वप्नील संजय शिंदे बसला होता. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी स्वप्नीलवर गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला सुद्धा केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राहुल पवार, अजय गायकवाड व एक अज्ञात व्यक्ती अशी आरोपींची नावे असून पोलीस या गोळीबाराचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

भावाच्या हत्येच्या बदल्यासाठी गोळीबार

चार महिन्यांपूर्वी आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याची हत्या झाली होती. या हत्येतील आरोपीला स्वप्नील शिंदे यानी मदत केल्याची माहिती राहुल पवारला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे राहुलने स्वप्निलवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. तीन आरोपींनी स्वप्नीलवर हल्ला केला. त्यापैकी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

इंदापूरमध्येही हॉटेलमध्ये गोळीबार

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे अविनाश धनवे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये ही घटना घडली. शनिवारी (16 मार्च) रात्री ही धक्कादायक घडली. अविनाश धनवे हा पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime : इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -