Monday, April 29, 2024
घरमानिनीसकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चालण्याचे फायदे

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चालण्याचे फायदे

Subscribe

चालणे शरीरासाठी अत्यंत साधा आणि सोपा व्यायाम आहे. चालल्याने आरोग्य सुधारते, असा सल्ला तज्ञ कायमच देतात. रोज सकाळी सूर्यप्रकाशात ३० मिनिटे चालल्यास शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन-डी ची पूर्तता पूर्ण होते. याशिवाय स्नायू आणि हाडेही मजबूत होतात. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात युवी रेजचा नकारात्मक प्रभाव नसतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात चालणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

सकाळच्या सूर्यप्रकाशात चालण्याचे फायदे (Benefits Of walking in Morning Sunlight)

बोन आणि मसल्स हेल्थसाठी फायदेशीर –

व्हिटॅमिन-डी नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून शरीरात तयार होते. व्हिटॅमिन-डी हाडांच्या आरोग्यासाठी आणि मसल्ससाठी खूप महत्वाचे असते. व्हिटॅमिन डी शिवाय शरीर कॅल्शियम शोषून घेत नाही. हाडे मजबूत, निरोगी आणि संसर्गमुक्त करण्यासाठी सकाळचा कोवळा 30 मिनिटांचा सूर्यप्रकाशही पुरेसा असतो.

- Advertisement -

मूड सुधारतो –

सूर्यप्रकाशामुळे मूड सुधारण्यास मदत होते. खरं तर, सूर्यप्रकाशामुळे मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढते. हे मूडशी संबंधित एक फील – गुड हार्मोन आहे. जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येता तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटण्यास मदत मिळते.

लठ्ठपणा कमी होतो –

एका अभ्यासानुसार, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर भूक कमी होते, ज्याने तुम्ही कमी खाता आणि वजन नियंत्रणात राहते.

- Advertisement -

त्वचेचे आरोग्य –

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात अल्ट्रा व्हायलेन्ट किरणे नसतात. त्यामुळे त्वचेच्या समस्येशी लढण्यास मदत होते. कोवळ्या उन्हामुळे सोरायसिससारखे आजार दूर होण्यास मदत होते.

ऑटोइम्युन रोगाचा धोका कमी होतो –

अभ्यासानुसार, जेव्हा त्वचा सूर्यप्रकाश शोषून घेते, तेव्हा नायट्रिक ऑक्सइड रक्तात सोडले जाते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते. कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे संधिवात, जळजळ, दमा सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

 

 


हेही पहा : भेंडीच्या पाण्यानेही होतो वेट लॉस

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini