Sunday, May 12, 2024
घरमानिनीReligiousKartiki Ekadashi : 5 महिन्यानंतर होणार शुभ कार्यांची सुरुवात; संपणार चार्तुमास

Kartiki Ekadashi : 5 महिन्यानंतर होणार शुभ कार्यांची सुरुवात; संपणार चार्तुमास

Subscribe

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 5 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होणार आहेत. तसेच मागील पाच महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरु होतील. सोबतच देवउठनी एकादशी पासून लग्नसोहळ्या सारखे मांगलिक कार्य देखील सुरु होतील.

देवउठनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त

देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे.
देवउठनी एकादशीची सुरुवात – 22 नोव्हेंबर रात्री 11:03 पासून
देवउठनी एकादशी समाप्ती – 23 नोव्हेंबर रात्री 09:01 पर्यंत असेल त्यानंतर द्वादशी तिथी चालू होईल.

- Advertisement -

देवउठनी एकादशीची पूजा

  • देवउठनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.
  • तसेच द्वादशी तिथीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह करावा.

देवउठनी एकादशीला का करावा तुलसी विवाह

Tulsi Vivah 2022 date Muhurta method and story | Tulsi Vivah 2022: इस दिन  होगा तुलसी विवाह, जान लें तारीख और शुभ मुहूर्त; भगवान विष्णु और माता  लक्ष्मी का मिलता है आशीर्वाद

यंदा चार्तुमास चार ऐवजी पाच महिन्याचा होता. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून सुरु होतो जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीपर्यंत असतो. जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा शालीग्राम/कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतरच इतर लग्नांचे मुहूर्ताची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार, चार्तुमासाच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टिचे कार्य हाती घेतात.

- Advertisement -

हेही वाचा :

‘या’ दिवशी साजरा होणार तुळशी विवाह; वाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

- Advertisment -

Manini