प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणेश जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल.
गणेश जयंतीला करा ‘हे’ उपाय
- Advertisement -
- यंदा मंगळवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल त्यांसाठी हा खास दिवस आहे.
- या दिवशी गरिब आणि गरजू व्यक्तीला लाल वस्त्र किंवा वस्तू दान करा.
- गणेश मंदिरात जाऊन मोदक, लाडवांचा प्रसाद अर्पण करा.
- या दिवशी गणेश मंदिरात जाऊन 21 दुर्वा अर्पण करा आणि जास्वंदीचे फुलाची माळ बाप्पाला घाला.
- या दिवशी जास्तीत जास्त गणेश मंत्र आणि अथर्वशीर्षाचे पठण करा.
गणेश जयंती तिथी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 05 : 44 पासून सुरु होणार असून मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 : 41 वाजेपर्यंत असणार आहे.
गणेश पूजा मुहूर्त : 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत असेल.