घरमहाराष्ट्रAshok Chavan: अशोक चव्हाणांसोबत इतर आमदार जाणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत इतर आमदार जाणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Subscribe

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसंच त्यांचा निर्णय हा अनपेक्षित आहे. परंतु ते जरी पक्षातून बाहेर पडले असतील, तरीही त्यांच्यासोबत एकही आमदार बाहेर पडणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत, येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्यावतीने भूमिका स्पष्ट केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसंच त्यांचा निर्णय हा अनपेक्षित आहे. परंतु ते जरी पक्षातून बाहेर पडले असतील, तरीही त्यांच्यासोबत एकही आमदार बाहेर पडणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Ashok Chavan Other MLAs will not go with Ashok Chavan Prithviraj Chavan s claim)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं. काँग्रेस आत्ताही त्यांना मोठी संधी देत होती. कालच आमची महाराष्ट्र प्रभारींसमवेत ज्येष्ठ नेते, अशोक चव्हाण यांची रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्या डोक्यात असं काही असेल असं वाटलं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,

- Advertisement -

.. तरी जनता सुज्ञ आहे

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हे सगळं कशामुळे घडतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. भाजपामध्ये लोकांमध्ये निवडणुकीला सामोरे जायचं धाडसं नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून काही संधी मिळतेय का? याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे नेते जरी गेले तरी त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मत देणारे मतदार व सर्वसामान्य जनता या नेत्यांबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकांमध्ये खरं चित्र दिसून येईल. त्यांना का हा निर्णय घ्यायला बाध्य केलं गेलं, हे कळत नाही. ते कदाचित एक-दोन दिवसांत सांगतील. त्यांना कशाची भीती होती हे तेच सांगतील, असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -