लग्न सोहळा हा वधू- वराच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाह सोहळ्यात अनेक विधी पार पडतात. यातीलच एक म्हणजे वधू-वर एकमेकांना हार घालतात म्हणजेच वरमाला घालतात. सुंदर फुलांनी लग्नसोहळ्यातील हार बनविला जातो. एकमेकांना हार घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे ते प्रतीक मानले जाते. पण यामागचा नेमका अर्थ आणि महत्व काय ते समजून घेऊयात,
हिंदू धर्मानुसार लग्नसोहळ्यात अनेक विधी – परंपरा संपन्न होतात. यातील प्रत्येक विधी मागे कारणे आणि महत्व आहे.
वधू- वरांनी एकमेकांना हार घालण्यामागचे महत्व –
धार्मिक परंपरेनुसार, वधू – वरांनी एकमेकांना हार घालणे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
हारातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू – वर या दोघांचे पुढील आयुष्य हसत खेळत जावे आणि आनंदाने भरलेले असावे.
हारातील फुले सुगंधित असतात. हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.
विवाह सोहळ्यात वधू – वर एकमेकांना हार घालतात, म्हणजेच याचा अर्थ असा की, वधू आणि वर यांच्या पुढील जीवनात विचाराने समानता राहावी.
जेव्हा वधू – वर एकमेकांना हार घालतात तेव्हा ते एकमेकांना स्वीकारण्याचे प्रतीक मानले जाते.
पुराणानुसार, समुद्रमंथनातून जेव्हा विष्णू प्रकट झाले होते तेव्हा देवी लक्ष्मीने त्यांना हार घालून त्यांचा स्वीकार केला होता.
भारतात पूर्वी स्वयंवर केले जायचे. त्यावेळी राजाला हार घालून वराची निवड केली जायची. म्हणजेच राजकुमारी त्याचा स्वीकार करायची.
असे मानले जाते की, फुलांचा हार हा वधू वराला एकमकांशी जोडतो.
विवाहसोहळ्यात फुलांचा हार घालून वधू – वर एकमेकांना आयुष्याच्या नव्या सुरुवातील शुभेच्छा देतात.
लग्नसोहळ्यात हार घालण्याची विधी किती जुनी आहे याबाबत ठोस अशी माहिती कुठेही सापडत नाही. मात्र, प्राचीन ग्रंथात अनेक विवाह सोहळ्यात या विधीचा उल्लेख आढळतो.
कोणत्या फुलांपासून हार बनविले जातात ?
प्रथेप्रमाणे विविधरंगी फुलांचा समावेश हार बनविण्यासाठी केला जातो. यात तुम्हाला लाल, पिवळं, गुलाबी आदी रंगाची फुले दिसतात. हार तयार कर्णयातही गुलाब, ऑर्किड, झेंडू या फुलांचा वापर केला जातो कारण ही फुले सौंदर्य, आनंद यांचं प्रतीक मानली जातात.
हेही पहा : Marriage Traditions : या देशात लग्नाआधी नवरीला नेतात पळवून
Edited By – Chaitali Shinde