Sunday, May 5, 2024
घरमानिनीReligiousसोमवारी शिव चालीसाचे पठण केल्याने मिळते अपार धन-संपत्ती

सोमवारी शिव चालीसाचे पठण केल्याने मिळते अपार धन-संपत्ती

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण विविध मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करतात. आज आम्ही महादेवाला प्रिय असणाऱ्या शिव चालीसाचे पठण करण्याचे फायदे सांगणार आहोत. पौराणिक ग्रंथांनुसार, शिव चालीसाचा पाठ केल्याने महादेव प्रसन्न होतात.

शिव चालीसा पठण करण्याचे फायदे

Difference Between “Om Namah Shivaya” And “Om Shivaya Namah”

- Advertisement -
  • शिव चालीसेचा पाठ नियमित केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
  • गर्भवती स्त्रिंयासाठी देखील हा पाठ खूप लाभदायी आहे.
  • या चालीसेचा पाठ केल्याने आरोग्य समस्या दूर होतात. असाध्य रोग देखील नष्ट होतो.
  • समाजात पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देखील हा पाठ केला जातो.
  • या पाठाच्या प्रभावाने साधकाला ऐहिक सुख, इच्छित फळ प्राप्त होतात. हा पाठ भक्तिभावाने केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते.

शिव चालीसा पठण कसे करावे?

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी शिव चालीसाचा पाठ करणं उत्तम मानलं जातं.
  • सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून हा पाठ करावा.
  • शिव चालीसेचा पाठ 3 वेळा जातो. तसेच मोठ्या आवाजात पाठ करावा.
  • पाठ करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये यावेळी मन एकाग्र करावे.
  • पाठ झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य अर्पण करावा.

 


हेही वाचा :

- Advertisement -

 

भाग्य वृद्धीसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी करा ‘हा’ उपाय

- Advertisment -

Manini