Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीशी शनीचा संबंध; ‘या’ उपायाने होईल शनी दोष मुक्ती

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीशी शनीचा संबंध; ‘या’ उपायाने होईल शनी दोष मुक्ती

2024 ची मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीला सूर्य देवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य देवाची उपासना केल्यास सुख आणि सौभाग्य वाढते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी शनीदोष असल्यास त्यातूनही मुक्ती मिळते असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीला सूर्य देव त्याचा मुलगा शनीदेवाच्या घरी त्याला भेटण्यासाठी जातो. शनीदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस हा चांगला मानला जातो.

शनी देव आणि मकर संक्रांतीचा संबंध

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला ‘मकर संक्रांत’ असे म्हणतात. मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे. सूर्य देव मकर संक्रांतीला शनी देवाच्या घरी जातात आणि जवळपास 1 महिना ते तिथे वास्तव्याला असतात. या दिवसात सूर्य देवाच्या तेजासमोर शनी देवाचे तेज मावळते असे म्हटले जाते. या मागे एक पौराणिक कथा देखील आहे. कथेमध्ये असे म्हटले आहे की, सूर्य देव पहिल्यांदा शनी देवांच्या घरी गेले होते तेव्हा शनी देवांनी त्यांचे काळे तीळ टाकून स्वागत केले होते. यामुळे सूर्य देव शनी देवावर प्रसन्न झाले. घर सुख संपत्तीने भरलेले असावे असा आशिर्वाद त्यांनी दिली. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाला काळे तीळ अर्पण करुन पूजा केली जाते.

शनी देवाला काळे तीळ फार प्रिय आहेत. त्यांची पूजा करते वेळी काळे तीळ आवर्जुन अर्पण करावे. मकर संक्रांती दिवशी काळे तिळांनी शनी देवाची पूजा केल्यास ज्यांच्या कुंडलीत शनी दोष आहे त्यांचावरील शनी दोषाचा प्रभाव कमी होतो.

 


हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : संक्रांतीला करावे ‘या’ गोष्टींचे दान; होईल पुण्यप्राप्ती

First Published on: January 11, 2024 12:20 PM
Exit mobile version