Mysterious Story : असे आहे चार युगांचे रहस्य; कलियुग संपण्यास ‘इतके’ वर्ष बाकी

Mysterious Story : असे आहे चार युगांचे रहस्य; कलियुग संपण्यास ‘इतके’ वर्ष बाकी

हिंदू धर्मात एकूण चार युगांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे आहेत. यातील प्रत्येक युगात हजारो वर्ष आहेत. त्यांचा कालावधी वेगवेगळा आहे आधीच्या तीन युगांचा अंत झाला असून सध्या कलियुग सुरु आहे.

सत्ययुग (कृतयुग)

युगाच्या चार भागांपैकी सत्ययुग पहिले मानले जाते. सृष्टीच्या सुरुवातीला सत्ययुगाची सुरुवात झाली होती. या युगात प्रत्यक्ष सर्व देवी-देवता, राक्षस, अप्सरा, गंधर्व वास करत होते. हे युग 1,728,000 वर्षांचे होते. हे युग सर्वात उत्तम मानले जाते.

त्रेतायुग

युगाच्या चार भागांपैकी त्रेतायुग दुसरे मानले जाते. या युगाच्या सुरुवातील वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली असे मानले जाते. सत्ययुगाचा शेवट झाल्यानंतर त्रेतायुगाची सुरुवात झाली. हे युग 1,296,000 वर्षाचे होते. या युगात श्रीराम, परशुराम, वामन या देवांनी अवतार घेतला होता.

द्वापारयुग

युगाच्या चार भागांपैकी द्वापारयुग तिसरे मानले जाते. हे युग 864,000 वर्षाचे होते. या युगात श्री कृष्णांनी अवतार घेतला होता.

कलियुग

युगाच्या चार भागांपैकी शेवटचे चौथे कलियुग मानले जाते. हे युग 432,000 वर्षाचे आहे. यातील 5121 वर्षे संपली असून, आता यातील 426,879 वर्षे बाकी आहेत. या युगात भगवान विष्णू कल्की  अवतार घेणार आहेत असं म्हटलं जातं.

 


हेही वाचा :

‘या’ रहस्यमय मंदिरात भरतो यमदेवाचा दरबार; आत्म्याच्या पाप-पुण्याचा केला जातो हिशोब

First Published on: August 4, 2023 2:45 PM
Exit mobile version