Saturday, May 11, 2024
घरमानिनीReligious'या' रहस्यमय मंदिरात भरतो यमदेवाचा दरबार; आत्म्याच्या पाप-पुण्याचा केला जातो हिशोब

‘या’ रहस्यमय मंदिरात भरतो यमदेवाचा दरबार; आत्म्याच्या पाप-पुण्याचा केला जातो हिशोब

Subscribe

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या मृत्यू देवता यमदेवाच्या मंदिराबाबत सांगणार आहेत. भारतातील प्रत्येक मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करतात पण या यमदेवाच्या मंदिरात कधीच कोणी फिरकत नाही. यमराजाच्या या मंदिरात अनेक रहस्ये दडलेली आहेत, असं म्हणतात की, या मंदिरात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा येथे येतो.

मृत्यूनंतर आत्मा यमदेवाच्या ‘या’ मंदिरात येतो?

दुनिया का इकलौता मंदिर, जहां लगती है यमराज की कचहरी, शाम चौरासी में तय होता  है कि आप स्वर्ग जाएंगे या नरक! - sham chaurasi temple bharmour yamraj ka  mandir chamba yamraj

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर या ठिकाणी यमदेवाचे हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिर खूप साधे असून ते एखाद्या घरासारखे दिसते. या ठिकाणी एक रिकामी खोली आहे. ज्यात यमदेव वास करत असल्याचं म्हटलं जातं. या खोलीला यमराज दरबार म्हटलं जातं. शिवाय येथील दुसऱ्या खोलीमध्ये चित्रगुप्त वास करतात.

असं म्हटलं जातं की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमदेवाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला या ठिकाणी घेऊन येतात. त्यानंतर चित्रगुप्त सर्व पाप-पुण्याची माहिती त्या आत्म्याला सांगतात. यावेळी त्या मृत व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जाणार की नरकात हे चित्रगुप्त त्याला सांगतो. मग त्यानंतरचा निर्णय यमदेव घेतात. यमदेवाच्या निर्णयानंतर यमदूत आपल्या कर्मानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात.

- Advertisement -

मंदिरात चार अदृश्य दरवाजे

yamraj temple himachal pradesh, हिमाचल की इस जगह पर है यमराज का एक ऐसा  मंदिर जहां जाने से कतराते हैं लोग, बाहर से जोड़ लेते हैं हाथ - story of  yamraj temple

गरुड पुराणात वर्णन केल्याप्रमाणे यमदेवाच्या दरबाराला चार दरवाजे आहेत. असं म्हटलं जातं की, या मंदिराला देखील चार अदृश्य दरवाजे आहेत. त्यातील एका दरवाजा पलीकडे सोने, दुसऱ्या पलीकडे चांदी, तिसऱ्या दरवाजा पलीकडे तांबे आणि चौथ्या लोखंड आहे.


हेही वाचा :

‘या’ रहस्यमय मंदिरातील देव चक्क 16 दिवस पडतो आजारी

- Advertisment -

Manini