उद्यापासून पौष महिना सुरू; शुभकार्य असणार वर्ज्य

उद्यापासून पौष महिना सुरू; शुभकार्य असणार वर्ज्य

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे एक विशिष्ट महत्त्व आहे. अशातच आता 12 जानेवारी 2024 पासून पौष महिन्याला सुरुवात होईल. हिंदू महिन्यातील हा दहावा महिना आहे. हा महिना 12 जानेवारी 2024 पासून ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल. पुरातन काळापासून पौष महिन्यामध्ये कोणेतेही शुभकार्य केले जात नाही. तसेच या महिन्याचे काही नियम, उपाय देखील सांगितले जातात.

पौष महिन्यात कोणते कार्य करु नये?

पौष महिन्यामध्ये अनेक कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. मुख्य म्हणजे मांगलिक कार्य आणि शुभ काम या महिन्यात करु नये. लग्न, साखरपुडा, पूजा, गृहप्रवेश, खरेदी अशी विविध कामं या महिन्यात करु नये.

पौष महिन्यात शुभकार्य का करु नये?

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह धनू राशीचा स्वामी असतो. जेव्हा गुरु आपल्याच राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते शुभ मानलं जात नाही. असं झाल्यास कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो. या राशीमध्ये सूर्य मलीन झाल्याने त्याला ‘मलमास’ देखील म्हटलं जातं. त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते.

पौष महिन्यात करा ‘हे’ उपाय


हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीशी शनीचा संबंध; ‘या’ उपायाने होईल शनी दोष मुक्ती

First Published on: January 11, 2024 6:15 PM
Exit mobile version