हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे. सध्या श्रावण महिना सुरु आहे त्यामुळे या काळात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दररोज शिव सहस्त्रनामाचे पठण करु शकता. यामुळे महादेव नेहमी तुमचे रक्षण करतील.
शिव सहस्त्रनामाचे पठण करण्याचे फायदे
- शिव सहस्त्रनामाचे पठण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होते.
- शिव सहस्त्रनामाचे पठणाने व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखमय राहते.
- शिव सहस्त्रनामाचे पठणाने आरोग्यासंबंधित समस्या देखील दूर होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, डोक्यासंबंधित आजारांमध्ये देखील शिव सहस्त्रनामाचे पठणाने लाभ मिळतो.
- जो व्यक्ती दररोज शिव सहस्त्रनामाचे पठण करतो त्याला दिर्घायुष्य प्राप्त होते त्याचा कधीही अकाल मृत्यू होत नाही.
- शिव सहस्त्रनामाचे पठणाने आयुष्यात सुख-समृद्धी येते तसेच मन शांत राहते.
- शिव सहस्त्रनामाचे पठणाने शत्रूंचा पराजय होतो. तसेच शनि दोषाचा सामना करावा लागत नाही.
शिव सहस्त्रनाम पठण करण्याचा विधी
- Advertisement -
- धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी शिव सहस्त्रनामाचे पठण करणे उत्तम मानले जाते.
- सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या स्तोत्राचे पठण करावे.
- शिव सहस्त्रनाम पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
- स्तोत्र पठण करताना मग एकाग्र करावे.
- दररोज शक्य नसल्यास सोमवार, महिन्यातील प्रदोष, पौर्णिमा आणि श्रावणात शिव सहस्त्रनामाचे अवश्य पठण करावे.
हेही वाचा :
आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ‘काळभैरव अष्टक’ आहे फायदेशीर
- Advertisement -
- Advertisement -