घरमहाराष्ट्र'कार्यकर्ते लढणार आणि तुम्ही नाती सांभाळणार'; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं

‘कार्यकर्ते लढणार आणि तुम्ही नाती सांभाळणार’; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं

Subscribe

तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या भेटीमुळे मविआत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत शरद पवारांना थेट सुनावल्याचं दिसून येत आहे.

राऊत म्हणाले की, तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. ( Thackeray Group leader Sanjay Raut criticised Sharad pawar Rohit pawar  )

- Advertisement -

नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय झाली चर्चा?

काँग्रेस नेते नाना पटोले हे मातोश्रीवर आले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेत शरद पवार, अजित पवार भेटीवर चर्चा झाली. या नेत्यांनी चिंता व्यक्त केल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्यात वारंवार संभ्रमाचे वातावरण होत आहे. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो. शरद पवार म्हणाले, अजितदादा पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य ऐकलं. नातीगोती सांभाळायची असतात, असं रोहित पवार म्हणाले. तुम्ही नातीगोती सांभाळायची तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मारामारी करायची? असा सवाल राऊतांनी यावेळी केला आहे.

( हेही वाचा: मविआत एकी कायम, संभ्रम निर्माण करू नका; शरद पवारांची स्पष्ट भूमिका )

- Advertisement -

अजित पवार, शरद पवार भेटीवर संजय राऊत म्हणाले की, लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे आहोत. नातीगोती प्रेम घरात. या लोकांनी आमच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून कोणी आम्हाला आव्हान देत असेल तर ते आमचे नातेवाईक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊतांनी DNAचं काढला

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा दोस्ताना होता. पण राजकारणात आपण वेगळे आहोत याची भावना ठेवूनच आम्ही त्यांच्याशी अंतर राखून आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणार नाही, हे पाहिलं पाहिजे. कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरायचं, गोळ्या खायच्या, तुरुंगात जायचं आणि ज्यांच्यामुळे जे घडलं त्यांच्यासोबत चहा प्यायची हे आमच्या डीएनमध्ये नाही. त्यांचा डीएनए वेगळा आहे, आमचा डीएनए वेगळा आहे. त्यामुळे ते काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -