Monday, May 6, 2024
घरमानिनीReligiousRose Day 2024 : राशीनुसार 'द्या' जोडीदाराला गुलाब, नात्यात येईल गोडवा

Rose Day 2024 : राशीनुसार ‘द्या’ जोडीदाराला गुलाब, नात्यात येईल गोडवा

Subscribe

गुलाबाच्या फुलाला सर्व फुलांमध्ये लोकप्रिय आणि खास फुल मानलं जातं. त्यामुळेच कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबाचे फुल दिले जाते. गुलाबाचा संबंध सरळ प्रेम आणि नात्याशी जोडला जातो. तुम्ही गुलाबाच्या फुलाबाबत अनेक गोष्टी ऐकल्या असतील परंतु ‘रोझ डे’च्या दिवशी गुलाबाचे फुल अनेक प्रेमी आपल्या पार्टनरला देतात. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या राशीनुसार देखील गुलाब देऊ शकता.

ज्योतिष शास्त्रात, गुलाबाला शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जाते. त्यामुळे जेव्हा हे आपण आपल्या जोडीदाराला देतो. तेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो, शिवाय यामुळे दोघांमधील नातेसंबंधही मजबूत होतात.

- Advertisement -

राशीनुसार द्या जोडीदाराला गुलाब

Background Of Textured Red Roses, Valentine Rose, Red Rose, Flower Gift Background Image And Wallpaper for Free Download

 

- Advertisement -

 

  • मेष

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे जर तुमच्या पार्टनरची रास मेष असेल तर तुम्ही लाल रंगाचे गुलाब द्या.

  • वृषभ

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. वृषभ राशीच्या पार्टनरला गुलाबी रंगाचे गुलाब द्या.

  • मिथुन

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे या राशीच्या जोडीदाराला रंगीबेरंगी गुलाबाचा गुच्छ द्या.

17 Rose Color Meanings To Help You Choose The Perfect, 56% OFF

  • कर्क

कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे या राशीच्या जोडीदाराला सफेद गुलाब द्या.

  • सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सिंह राशीच्या पार्टनरला नारंगी रंगाचे गुलाब द्या.

  • कन्या

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे या राशीच्या जोडीदाराला रंगीबेरंगी गुलाबाचा गुच्छ द्या.

The most beautiful pink roses - Plantura

 

  • तूळ

तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तूळ राशीच्या पार्टनरला हलक्या गुलाबी रंगाचे गुलाब द्या.

 

  • वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे जर तुमच्या पार्टनरची रास वृश्चिक असेल तर तुम्ही गडद लाल रंगाचे गुलाब द्या.

  • धनु

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. धनु राशीच्या पार्टनरला पिवळ्या रंगाचे गुलाब द्या.

Yellow Roses Pictures | Download Free Images on Unsplash

  • मकर

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. मकर राशीच्या पार्टनरला निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे गुलाब द्या.

  • कुंभ

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. कुंभ राशीच्या पार्टनरला रंबीबेरंगी गुलाबाचा गुच्छ द्या.

  • मीन

मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. मीन राशीच्या पार्टनरला हलक्या पिवळ्या रंगाचे गुलाब द्या.

 


हेही वाचा :

Rose Day 2024: ‘या’ कारणासाठी साजरा केला जातो ‘रोझ डे’!

- Advertisment -

Manini