प्रेमात असलेल्या प्रत्येक कपल्स, लव्हर्ससाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. प्रेमी कपल्सच्या विशेष आठवड्याचा पहिला दिवस हा ‘रोझ डे’ असतो तर शेवटचा ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो. प्रेमाचा हा आठवडा ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी असतो. ज्यामध्ये कपल्स आपल्या जोडीदाराला गुलाब, टेडी आणि चॉकलेट देऊन एकमेकांशी त्यांच्या भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने होते. हे लव्ह बर्ड्स त्यांच्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची मदत घेतात. तुम्ही कधी विचार केला आहे, का की प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीलाच रोझ डे का साजरा केला जातो? काय आहे याचं महत्त्व आणि नेमका काय आहे या मागचा इतिहास? त्याविषयी जाणून घेऊया.
रोझ डे कधी साजरा केला जातो?
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने होते. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी कपल्स त्यांच्या पार्टनरला गुलाबाचे फूल देऊन त्यांच्या प्रेम भावना व्यक्त करतात.
रोझ डे का साजरा केला जातो ?
गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लोक त्यांच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून एकमेकांना गुलाबाचे फूल देतात. रोझ डेच्या दिवशी आपल्या आवडीच्या किंवा प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फूल किंवा पुष्पगुच्छ दिला जातो.
रोझ डेचा इतिहास
रोझ डे हा मुघल काळापासूनचा असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की, मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाबाची खूप आवड होती आणि त्यांचे पती त्यांच्या बेगमला खुश करण्यासाठी दररोज एक टन फुले पाठवत असत. यामुळे नूरजहाँ खूप खूश होती. याशिवाय असंही सांगितलं जातं, की महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात लोकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाची फुलं एकमेकांना देणं आणि घेणं ही परंपरा सुरू केली होती. व्हिक्टोरियन आणि रोमन लोकसुद्धा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फूलच वापरत होते. रोझ डेचा इतिहास फार रंजक आहे. इ. सन पूर्व 30च्या काळात गुलाबाच्या फुलांना प्रेमाचं प्रतीक मानलं जायचे. राणी क्लिओपात्रानेसुद्धा आपली खोली सजवण्यासाठी गुलाबाची फुलं वापरली होती. त्यामुळं व्हॅलेंटाइन वीकच्या आधी “रोझ डे” साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डेचा आठवडा (Valentine Week List 2024)
7 फेब्रुवारी – रोज डे, बुधवार
8 फेब्रुवारी – प्रपोज डे, गुरुवार
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे, शुक्रवार
10 फेब्रुवारी – टेडी डे, शनिवार
11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे, रविवार
12 फेब्रुवारी – हग डे, सोमवार
13 फेब्रुवारी – किस डे , मंगळवार
14 फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे, बुधवार