घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी..., आव्हाडांकडून संताप व्यक्त

Maharashtra Politics : 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी…, आव्हाडांकडून संताप व्यक्त

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाचं असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. यासोबतच बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव देण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सडकून टीका करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. ते दिल्लीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics Spending so much political power to kill an 84 year old Jitendra Awhad expresses anger)

हेही वाचा – Jitendra Awhad : राष्ट्रवादी पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाला पर्याय दिले, मात्र… आव्हाडांकडून दावा

- Advertisement -

आम्ही पर्याय दिले होते, मात्र निवडणूक आयोगाने मोठे घोटाळे करून ठेवले आहेत, असा संताप व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवारांना संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जात आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याची गरज आहे. आम्ही दिलेल्या पर्यायांचा कागदपत्रात साधा उल्लेख केलेला नाही. हे त्यांनीच लिहिलं आहे का? याबद्दलही शंका आहे. जर निवडणूक आयोगासारखी संस्था कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीरपणे निर्णय घेणार असेल तर हे धक्कादायक आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

आम्ही पर्यायच दिला नाही इतकं खोटं निवडणूक आयोग कसं काय बोलू शकतं? असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला की, शरद पवारांना संपवण्यासाठी, राजकीय वजन घटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या गेल्या आहेत, याची निवडणूक आयोगाला कल्पना नाही. 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं अजित पवार कंपनीला शोभत नाही. जो माणूस मरणासाठी प्रार्थना करू शकतो, तो काहीही करू शकतो, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Police : कुवेतमधून बोट चोरली, समुद्रमार्गे मुंबईत आले; पोलिसांकडून तिघांची चौकशी सुरू

निवडणूक आयोगाकडून कागदपत्रांचा अभ्यास नाही

निवडणूक आयोगावर आरोप करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाने कागदपत्रांचा अभ्यासच केला नाही. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक पेपरमधील प्रत्येक वाक्य संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. ते एका खोलीत बसून राष्ट्रीय पक्ष आणि अध्यक्षांबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणत नोटीस कोणाला पाठवली? त्याची प्रत कुठे आहे? संविधानाप्रमाणे काहातरी झालं पाहिजे. निर्णय कशाच्या आधारे दिला आहे? असा प्रश्नांचा भडीमार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -