Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझ्या ठायीं अतिनिपुण । आतां मातें पावती हें कवण । समर्थावें? ॥
असे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि त्यातून माझ्या ठिकाणी पूर्ण भक्ती करितात, ते मद्रूप होतात. यांचे निराळे काय समर्थन करायला पाहिजे!
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळें । तींहीं निर्जिवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥
हे पाहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते.
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हे समर्थावें । तेव्हां कायी साच? ॥
तर मग चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही, अशी मनात शंका कशी धरावी? अथवा त्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितले तरच ते खरे, नाही तर ते खोटे असे होईल की काय?
जेथ निववील ऐशिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥
शंकरांनी विष प्राशन केल्याने त्यापासून होणार्‍या दाहाचे शमन होईल, अशा आशेने जर मस्तकावर अर्धचंद्र निरंतर धारण केला.
तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहून आगळा । तो चंदनु केवीं अवलीळा । सर्वांगीं न बैसे? ॥
तर दाहाचे शमन करणारा व पूर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन, तो सर्वांगावर सहजच का धारण केला जाणार नाही!
कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे? ॥
किंवा रस्त्यावरील उदके जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात, त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय?

- Advertisment -

Manini