घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २४ एप्रिल २०२४

राशीभविष्य : बुधवार २४ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – प्रश्नांचे उत्तर मिळेल. तुमचे विचार इतरांना विचारात घ्यावे लागतील. जवळच्या व्यक्तीसाठी नियम बदलण्याची वेळ येईल.

वृषभ – कामात दगदग वाढेल. सहकारी मदत करतील. खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

मिथुन – मित्र-परिवाराबरोबर वेळ मजेत जाईल. सामाजिक कार्यात ठरवाल ते करता येईल. वेळेत कामे पार पाडता येतील.

कर्क – घरात महत्वाचा निर्णय घेता येईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाला बक्षीस मिळेल.

- Advertisement -

सिंह – आत्मविश्वासने एखादे कार्य करता येईल. अडचणी दूर करण्यात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कन्या – धंद्यात आर्थिक लाभ होईल. भेटी-गाठीत यश मिळेल. विरोधाला मोडून काढता येईल. कोर्ट केस जिंकाल.

तूळ – घरातील प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था होईल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल. महत्त्वाचा फोन येईल.

वृश्चिक – आळस वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात लक्ष दिल्यास नुकसान टाळता येतील. वाहन जपून चालवा.

धनु – सामाजिक कार्यात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कला- क्रीडा स्पर्धा जिंकता येईल. आनंद मिळेल.

मकर – कला-क्रीडा क्षेत्रात आशेचा किरण दिसल्याने प्रयत्नांना जोर येईल. आर्थिक उलाढाल करण्यात यश मिळेल.

कुंभ – प्रवासाचा बेत सफल होईल. आर्थिक गणिते जुळून येतील. धंद्यात आर्थिक लाभ होईल. नोकरवर्गाची नाराजी दूर होईल.

मीन – घरात वाद व तणाव निर्माण होईल. शांततेतून मार्ग काढा. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -